व्हायरल पोस्ट, (फोटो क्रेडिट्स: ट्विटर)

Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येत आहे की, 'जीवन लक्ष्य योजना' अंतर्गत केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये रोख रक्कम देत आहे. पण ही बातमी खोटी आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना राबविलेली नाही. भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून फॅक्ट चेकद्वारे सांगितलं की, ही बातमी बनावट आहे. त्याचा सत्याशी काही संबंध नाही. अशा बनावट बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन सरकारने केलं आहे.

इंटरनेटवर व्हायर चुकीच्या माहिती आणि बनावट बातम्यांना आळा घालण्यासाठी प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने डिसेंबर 2019 मध्ये फॅक्ट चेक शाखा सुरू केली. सरकारचे धोरण आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केलेल्या योजनांशी संबंधित चुकीची माहिती ओळखणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. अशा बनावट व्हायरल पोस्ट्स शेअर करू नयेत म्हणून सरकार वारंवार सूचना देत असते. (हेही वाचा - Shut Up Ya Kunal: संजय राऊत यांची कुणाल कामरा याच्या 'शट अप या कुनाल' कार्यक्रमात टोलेबाजी, पाहा व्हिडिओ)

दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक हे एक समर्पित व्यासपीठ आहे, जे सरकारी योजना आणि धोरणांशी संबंधित चुकीच्या माहितीच्या सत्याची तपासणी करते. जर आपल्याला कोणतीही बनावट बातमी मिळाली तर आपण त्यास बातम्यांशी संबंधित अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन माहिती मिळवू शकता.