शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) हे नेहमीच आपल्या वादग्रस्त आणि मिश्कील वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. या वेळी निमित्त ठरले आहे ते प्रसिद्ध कॉमेडीयन कुनाल कामरा (Kunal Kamra) याच्या 'शट अप या कुणाल' (Shut Up Ya Kunal) या कार्यक्रमातील विधानांमुळे. कुनाल कामरा या युट्युब चॅनलवरुन हा शो प्रसारित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता.
संजय राऊत यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे की, या देशामध्ये काणीही सेक्युलर नाही. जे स्वत:ला सेक्युलर मानतात ते सर्वाधिक धर्मांत असतात. खरेत आजकाल सेक्युलर ही एकप्रकारची शिवी झाली आहे. ज्याचा राजकारणामध्ये चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. कुनाल कामरा यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर संजय राऊत यांनी या वेळी दिली. (हेही वाचा, Sanjay Raut On BJP: जुनी थडगी उकरु नका, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा किरीट सोमय्या, भाजप नेत्यांना इशारा)
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेची विचारसरणी समजून घ्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हा देश राज्यघटनेनुसार चालला पाहिजे. सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजेचत परंतू, तसे होता जात धर्माच्या आधारावर राजकारण केले जात आहे. यात मुस्लिम धर्माचा आधार घेऊन अधिक राजकारण केले जात आहे. न्यायालयातही मुस्लिम कुरानवर हात ठेऊन, हिंदू भगवतगीतेवर हात ठेऊन शपत घ्यायची हे बाळासाहेबांनी तेव्हाच बंद करायला सांगतले होते. हे सगळे बंद करुन केवळ संविधानावरच हात ठेऊन शपथ घ्यायाला लावायला हवी असे बाळासाहेब म्हणाले होते आणि तिच आमची विचारधारा आहे आणि कायम तिच राहणार असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.