Image For Representations (Photo Credits: Pixabay, Pixhere)

एखाद्याला जिवंतपणीच मृत्युशय्येवर निजायला सांगितलं, किंवा मृत कबरीत जमिनीखाली पुरून ठेवलं तर.. खरतर हा विचारच प्रचंड भीषण वाटतो. मात्र नेदरलँड (Netherland) देशातील एका विद्यापीठाने असे केल्यावर तुम्हाला ताण कमी करण्यास मदत होत असल्याचा दावा केला आहे. Radboud University, Nijmegen या संस्थेने विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्याच्या हेतूने एक प्युरीफेक्शन कबर (Purification Grave)  खोदली आहे, यालाच ध्यानसाधना कबर (Mediation Grave)  असेही म्हणतात. यामध्ये काही काळ राहिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अस्तित्वाची किमंत पटुन ताण दूर होण्यास मदत होते असाही दावा केला जात आहे. निश्चितच ताण घालवण्यासाठी ही काही बेस्ट किंवा सर्वमान्य पद्धत नसली तरी सध्या यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना प्रार्थना करण्यासाठी बांधण्यात आलेल्या चॅपेल समोरच ही कंबर खोदण्यात आली आहे.मागील काही काळात याच फार वापर केला गेला नसला तरी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये ही कंबर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. याविषयी, विद्यापीठाचे अधिकारी माहिती देताना सांगतात की, कोणत्याही प्रकारचा ताण मितव्यसाठी ध्यानसाधना हा एक सिद्ध पर्याय आहे. पाऊले तुम्हाला स्वत्वा पासून ते जगाच्या मूळ संकल्पेनबद्दल सर्व प्रकारची माहिती मिळवता येऊ शकते, तसेच यामुळे तुमच्या मेंदूला उत्तेजना मिळून नव्य कामांमध्ये एकाग्रता निर्माण होण्याशी फायदा होतो. हीच ध्यानसाधना करण्यासाठी ही कंबर खोदण्यात आली आहे.

या उपक्रमाची सुरुवात जॉन हॅकिंग यांच्या कल्पनेतून झाली होती ते सांगतात की, 18 ते 20 या वयोगटातील मुलांशी मृत्यू किंवा अनेकय विषयांवर बोलणी फारच कठीण असते, मात्र त्यांच्यातील नैराश्य पाहता ते आयुष्य सुद्धा आनंदाने जगतायत का यावर शंका येते? या उपक्रमातून काहीच वेळासाठी तुम्हाला जिवंत वातावरणापासून वेगळे केले जाते आणि त्यामुळेच तुमच्या अस्तित्वाचे महत्व पटण्यास मदत होते.

दहावीच्या परिक्षेच्या तणावातून दोन विद्यार्थिनींची आत्महत्या,एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर

दरम्यान, मागील काही काळात वाढत्या स्पर्धेमुळे परीक्षेचा ताण हा गंभीर विषय ठरला आहे. यातुन अनेकांनी आपले आयुष्य देखील संपवले आहे, त्यामुळे या उपक्रमातून प्रत्येकाला आपल्या आयुष्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

(टीप- हे आर्टिकल प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आले आहे. प्रत्यक्ष आयुष्यात योग्य देखरेखीशिवाय असा कोणताही प्रयोग करून पाहणे अपायकारक ठरू शकते)