SBI Account Scam Alert: स्टेट बॅंक ऑफ इंडिया च्या ग्राहकांना त्यांचं अकाऊंट ब्लॉक झाल्याचे Fake SMS; PIB Fact Check ने केला वायरल मेसेजचा खुलासा
Fake News on SBI Account (Photo Credits: PIB)

सध्या SBI ग्राहकांना त्यांचं अकाऊंट ब्लॉक झाल्याचा मेसेज अनेकांची दिशाभूल करत आहे. या फेक मेसेज मध्येच ग्राहकांना एका लिंक वर जाऊन डॉक्युमेंट्स अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. या मेसेज सोबर केवायसी लिंक (KYC Link) देखील देण्यात आली आहे. यावर क्लिक करून नेट बॅंकिंग (Net Banking) द्वारा अपडेट करण्यासाठी आवाहन केले जात आहे. नक्की वाचा: SBI चे ग्राहकांना आवाहन; चुकूनही 'या' सुचनांकडे करू नका दुर्लक्ष.

तुम्हांला देखील असा मेसेज आला असेल तर त्याला फसू नका कारण या मेसेज द्वारा तुमची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. एसबीआय च्या नावे फिरणारा हा मेसेज फेक आहे. पीआयबी कडून त्याचे फॅक्ट चेक करण्यात आले असून हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यांनी ट्वीट करत नागरिकांनी या मेसेज पासून सावध रहावं. अशाप्रकारच्या मेसेजला भूलून जाऊ नका. या इमेल किंवा मेसेज करू नका तसेच कोणतीही माहिती देखील अपडेट करू नका असं कळकळीचं आवाहन करण्यात आले आहे.

PIB Fact Check ट्वीट 

पीआयबी फॅक्ट चेक द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर कोणाला हा मेसेज मिळाला असेल तर बॅंक अथॉरिटीला report.phishing@sbi.co.in या इमेल आयडी वर कळवावे. सोशल मीडीयात सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी पसरवला जाणारा हा काही पहिलाच मेसेज नव्हे. यापूर्वी देखील असे अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये नागरिकांनी दक्ष रहावं. माहिती पडताळूनच त्यावर विश्वास ठेवा असं आवाहन सरकारने यापूर्वी देखील वारंवार केले आहे.