सोशल मीडीयामध्ये कोरोना संकट काळात अनेक अफवा, चूकीच्या बातम्या, खोट्या बातम्या झपाट्याने वायरल होत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये आता एका युट्युब चॅनलवरून सध्या असा एक दावा केला जात आहे की केंद्र सरकार एक परिवार एक नोकरी योजना राबवणार आहे. पण हा दावा खोटा आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या वायरल माहितीची सत्यता पडताळून खरी माहिती लोकांसमोर आणली आहे.. पीआयबी फॅक्ट चेक ने हा खोटा दावा फेटाळून लावला आहे.
दरम्यान सध्या सोशल मीडीयात लोकांमध्ये भीतीचं किंवा गोंधळाचं वातावरण निर्माण करून त्यांच्या खाजगी माहितीवर डल्ला मारण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. सध्या एका युट्युब चॅनेलवरून असेल केंद्र सरकार घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार असल्याचं वृत्त वायरल केले जात आहे. पण तुमच्यापर्यंत अशी माहिती आली असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि खोटे वृत्त शेअर देखील करू नका. (नक्की वाचा: PIB Fact Check: भारत सरकार कडून 'कोरोना केयर फंड योजना' अंतर्गत सार्यांना 4000 रूपयांची मदत मिळणार? पहा या वायरल व्हॉट्सअॅप मेसेज मागील सत्य).
पीआयबी फॅक्ट चेक
दावा: एक यूट्यूब चैनल पर दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार द्वारा "एक परिवार एक नौकरी योजना" के तहत हर परिवार के एक सदस्य को सरकारी नौकरी दी जाएगी।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/fOpN2pW94i
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 10, 2021
सध्या सोशल मीडियात झपाट्याने पसरणारे खोटे वृत्त पाहता निर्माण होणारा गोंधळ पाहता आता सरकारचं एक पाऊल पुढे आले आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेत खोटी आर्थिक मदत, वैद्यकीय सल्ले ते नोकरीची आमिष अशा अनेक प्रकारच्या खोट्या बातम्यांमधून नागरिकांची फसवणूक झाल्याचं पहायला मिळालं आहे. सरकार कडून वेळोवेळी वायरल होणार्या खोट्या बातम्यांची सत्यता पीआयबी फॅक्ट चेक या ट्वीटर अकाऊंट वरून जनतेसमोर ठेवली जात आहे त्यामुळे तुमच्याकडे आलेल्या देखील कोणत्याही माहितीवर थेट विश्वास ठेवू नका. सरकारी वेबसाईट आणि अधिकृत सुत्रांकडूनच माहिती तपासून त्याच्यावर विश्वास ठेवा.