Fake News on Pradhan Mantri Kanya Ayush Yojana (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर अनेक मेसेजेस व्हायरल होत असतात. त्या मेसेजमागील सत्यता तपासल्याशिवाय ते फॉरवर्ड करणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे धोकादायक, त्रासदायक ठरु शकते. दरम्यान सध्या प्रधानमंत्री कन्या आयुष योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kanya Ayush Yojana) प्रत्येक मुलीला 2000 रुपये देण्यात येत आहेत. असा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) कडून यामागील सत्यता तपासण्यात आली आहे. (BPPS मधून योगा टिचर ट्रेनिंग कोर्स केल्यास सरकारी योगा डिप्लोमा मिळणार? PIB Fact Check ने केला व्हायरल जाहिरातीचा खुलासा)

पीआयबीने ट्विटद्वारे या मेसेजमागील सत्यता उलघडा केला आहे. हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बोगस योजनेपासून सावध रहा, असे ट्विट पीआयबी फॅक्ट चेककडून करण्यात आले आहे.

दावा: प्रधानमंत्री कन्या आयुष योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला 2000 रुपये देण्यात येत आहेत.

पीआयबी फॅक्ट चेक: केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बोगस योजनेपासून सावध रहा.

Fact Check by PIB:

यापूर्वी देखील अशा प्रकराचे अनेक खोटे आणि दिशाभूल करणारे मेसेज व्हायरल झाले होते. कोरोना संकटकाळात तर खोट्या मेसेजेंना उधाण आले. दरम्यान कोणत्याही मेसेजमागील सत्य जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगत सरकारकडून नागरिकांना वारंवार सतर्क करण्यात येत होते.