Fake Advertisement (Photo Credits: Twitter)

भारतीय प्रौद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (Bhartiya Prodyogik Prashikshan Sansthan) योगा टिचर ट्रेनिंग कोर्स (Yoga Teacher Training) केल्यास प्रशिक्षणार्थींना सरकारी योगा डिप्लोमा (Yoga Government Diploma) देण्यात येत आहे, अशी जाहिरात सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. यात जाहिरातीत असे म्हटले आहे की, इच्छुकांनी BPPS मधून योगा टिचर ट्रेनिंग कोर्स केल्यास त्यांना MSME मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. 10 दिवसांचे योगा वर्कशॉप अर्जदाराच्या सोयीनुसार कोणत्याही भागात घेतले जाईल. यासाठी केवळ 9750 रुपये फी असल्याचे सांगण्यात आले आहे. या कोर्समध्ये अॅडमिशन घेण्यासाठी आधार कार्ड आणि 3 पासपोर्ट साईज फोटोची आवश्यकता आहे. असेही या जाहिरातीत पुढे सांगण्यात आले आहे.

या व्हायरल होणाऱ्या जाहिरातीची पडताळणी पीआयबी फॅक्ट चेककडून करण्यात आली तेव्हा ही जाहिरात खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे उघडकीस आले. "हा दावा दिशाभूल करणारा आहे. MSME मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाकडून अशा प्रकारचा कोणताही कोर्स सुरु करण्यात आलेला नाही किंवा कोणत्याही कोर्ससाठी सरकारी प्रमाणपत्र दिले जात नाही," असे सांगण्यात आले आहे. (हे ही वाचा: 1 सप्टेंबर पासून विजेचे बिल माफ करण्यासाठी केंद्र सरकार आणणार स्पेशल योजना? PIB ने केला खुलासा)

Fact Check by PIB:

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात फेक आणि दिशाभूल करणारे मेसेज, न्यूज यांना पेव फुटल होते. सोशल मीडियावर अशा प्रकराचे मेसेजेस जोरदार व्हायरल होत होते. दरम्यान अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजेसवर विश्वास ठेऊ नका अशा प्रकारचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत होते.