दीर्घकाळ काम केल्याने वर्षाला हजारो जणांचा मृत्यू, WHO च्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
Workplace (Photo Credits: Unsplash)

डब्लूएचओ (WHO) आणि लेबर ऑर्गनाइजेशन यांच्याकडून एक रिसर्च करण्यात आला आहे. त्यामधून अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, वर्ष 2016 मध्ये दीर्घकाळ काम केल्यामुळे स्ट्रोक आणि इस्केमिक हार्ट डिजीज मुळे 7 लाख 45 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी 2000 मध्ये झालेल्या मृतांपैकी 29 टक्के अधिक होती. पहिल्यांदाच अशा प्रकारची आकडेवारी अभ्यासातून समोर आली आहे.(Fact Check: ऑक्सिजनची कमतरता असल्यास होम्योपॅथिक औषध 'Carbo vegetabilis' येईल कामी? जाणून घ्या व्हायरस मेसेज मागील सत्य)

डब्लूएचओ (WHO) च्या पर्यावरण, क्लायमेट चेंज आणि हेल्थ डिपार्टमेंट मधील डायरेक्टर मारिया नीरा यांनी असे म्हटले आहे की, आम्हा असे वाटते रिचर्स मधून समोर आलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी योग्य उपाय केला पाहिजे. रिसर्चनुसार, दीर्घकाळापर्यंत काम करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक 72 टक्के पुरुषांचा समावेश होता.

194 देशांनी या प्रकारचा अभ्यास केला. त्यानुसार. 55 तासांहून अधिक काम करणाऱ्यांमध्ये स्ट्रोकचा धोका 35 टक्के आणि इस्केमिक हार्ट डिजीज होण्याची शक्यता 17 टक्के अधिक असते. तर रिसर्च 2000-2016 दरम्यान मध्ये कोरोनाची आकडेवारी सहभागी करण्यात आलेली नाही. मात्र कोरोनाच्या काराणामुळे वर्क फ्रॉम होम आणि आर्थिक तंगीमुळे स्थिती अधिक बिघडली गेली. निष्कर्ष निघतो की, असे काम करणाऱ्या 9 टक्के लोकांना दीर्घकाळापर्यंत काम करावे लागत आहे.(Covid-19 ची नवी लक्षणे आली समोर; तोंड कोरडे पडत असेल किंवा खाज सुटत असेल तर चाचणी करून घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला)

तसेच डब्लूएचओच्या रिपोर्ट्सनुसार, दीर्घकाळापर्यंत काम करणाऱ्या साउथ-ईस्ट-एशिया आणि वेस्टर्न पेसिफिक क्षेत्रातील लोकांचा समावेश होता. ज्यामध्ये चीन, जापान आणि ऑस्ट्रेलियालातील सर्वाधिक जण प्रभावित झाले होते. मारिया नीरा यांच्यानुसार, पँडेमिकचा प्रभाव डब्लूएचओच्या स्टाफवर सुद्धा पडला आहे. त्यांनी म्हटले की, डब्लूएचओचे कर्मचारीच नव्हे तर डायरेक्टर जनरल ट्रेड्रोस अधानोम ग्रॅब्रिएसिस यांना सुद्धा कोरोना व्हायरसमुळे दीर्घकाळापर्यंत काम करावे लागत आहे. म्हणजेच कामाचे तास वाढले गेले आहेत.