Fact Check: ऑक्सिजनची कमतरता असल्यास होम्योपॅथिक औषध 'Carbo vegetabilis' येईल कामी? जाणून घ्या व्हायरस मेसेज मागील सत्य
PIB Fact Check (Photo Credits-Twitter)

Fact Check:  सध्या सोशल मीडियात सातत्याने कोरोना संबंधित चुकीच्या माहिती आणि बातम्या तुफान व्हायरल केल्या जात आहेत. अशातच एका मेसेजमध्ये आता असा दावा केला आहे की,  होम्योपॅथिक औषधांच्या 2-3 ड्रॉप्सने शरीरातील ऑक्सिजनचा स्तर पूर्ण केला जाऊ शकतो. या होम्योपॅथिक औषधाचे नाव 'Carbo vegetabilis' असल्याचे सांगण्यात आले आहे. हा मेसेज सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

PIB फॅक्ट चेक कडून या व्हायरल मेसेजमागील सत्यता समोर आणली आहे. त्यांनी असे म्हटले की, मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. त्यामुळे श्वास घेण्यास जर तुम्हाला समस्या येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.(Fact Check: भारतामध्ये 12 वर्षांवरील मुलांना Bharat Biotech च्या COVAXIN वापराला मिळाली मंजुरी? जाणून घ्या वायरल मेसेज मागील PIB ने सांगितलेलं सत्य)

दावा: 'Carbo vegetabilis' नावाच्या होम्योपॅथिक औषधाचे 2-3 ड्रॉप्स घेतल्यास शरीरातील ऑक्सिजनचा स्तर पूर्ण होतो.

Tweet:

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आल्यास जरुर डॉक्टरांशी संपर्क साधा. सावधगिरी बाळगा आणि फक्त घरगुती उपायांवर राहू नका. त्यामुळे समस्या वाढू शकते.

दरम्यान, सोशल मीडियात सध्या कोरोना संबंधित उपचार, लॉकडाउन, कर्फ्यू संबंधित विविध फेक न्यूज वेगाने व्हायरल होत आहे. आम्ही अपील करतो की, कोणत्याही माहितीच्या पुष्टी शिवाय ती शेअर करु नका. कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सतत्या जाणून घ्या. अफवा पसरवण्यापासून सावध रहा.