Ocean Creature Transparent Cystisoma | (Photo Credit - Twitter)

सोशल मीडीयावर (Social Media) एका समुद्री जीवाचा (Ocean Creature Viral Video) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यावर संशोधक आजही संशोधन करत आहेत. या जीवाचे वैशिष्ट्य असे की, तो पूर्णपणे पारदर्शी आहे. सिस्टिसोमा (Cystisoma ) असे त्याचे नाव आहे. त्याचा पारदर्शीपणा पाहून शास्त्रज्ञही अवाक झाले आहेत. या जीवाला मासा म्हणायचे की आणखी काही यावर नेटीझन्समध्ये अद्यापही चर्चा झडत आहेत.पण हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते हे मात्र खरे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

मॅसिमो नामक युजरने ट्विटरवर या समुद्री जीवाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की सिस्टिसोमा हा एक क्रस्टेशियन (समुद्री जीव) आहे जो समुद्रात 600-1000 मीटर खोलवर राहतो. त्याचे शरीर पूर्णपणे पारदर्शक आहे. फक्त त्याचे डोळे रंगीत आहेत. त्याच्याकडे संत्र्या रंगांसारख्या अंड्यांनी भरलेला एक छोटा बटवाही आहे. (हेही वाचा, Weever Fish: वाळूतला मासा, लपतो कसा? हळूच मारतो डंक, समोरचा बेशुद्ध; नाव त्याचे 'वीवर फिश')

व्हिडिओत पाहायला मिळते की, सिस्टिसोमा नावाचा हा जीव एका व्यक्तीच्या हातात आहे. त्याचे अवयव इतके नाजूक आणि पारदर्शी आहेत की, ते ओळखणे कठीण ठरते. पाण्यात ते ओळखणे तर आणखीच कठीण. सिस्टिसोमाचे डोळेच त्याच्या शरीराचा सर्वाधिक भाग व्यापतात. जे त्याच्यासाठी फायद्याचे ठरते वॉशिंग्टन डीसी येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमधील संशोधन शास्त्रज्ञ कॅरेन ऑस्बोर्न यांनी द गार्डियनला सांगितले की, या जीवाचा डोळा जितका मोठा तितका त्याला अधिक फायदा होतो. कारण, त्याचे भक्ष्य टीपणे त्याला अधिक फायद्याचे ठरते. कारण डोळे छोटे असतील तर 200 ते 900 मीटर खोल पाण्यात असलेल्या सिस्टिसोमाला अन्य शोधण्यासाठी मोठ्या अडचणी येऊ शकतात.

ट्विट

सृष्टी हा एका नानावीध जीव-जंतू, कीटक, प्राणी पक्षी आणि वनस्पतींसह असंख्य असे लहान, मोठे्या पदार्थांनी आणि नानावधी घडामोडींनी बनलेला अवकाश. जगभरातील अनेक संशोधकांनी आजवर यावर संशोधन केले आहे. हे संशोधन आजही सुरु आहे. उद्याही सुरु राहील. पण, अद्यापही सृष्टीतील असंख्य जीवांचा अभ्यास अजूनही अभ्यासकांना लागला नाही.