Close
Search

Land Cracks In Barmer: राजस्थानमध्ये 1.5 एकर शेताखालची जमीन 70 फूट खोल खचली, धोकादायक परिसर लोकांसाठी बनाला Selfie Point

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सहग्रासर गावातील रहिवासी जमीन खचण्याच्या (Land Sunk) धक्कादायक घटनेने हादरून गेले आहेत. या गावातील एक शेत अचानक 70 फूट खोल खचले आहे. ही घटना एका रात्रीत घडली आहे. त्यामुळे गावात भीती आणि कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हायरल अण्णासाहेब चवरे|

Bikaner Land Sink |(Photo Credit: X/ @Mahen_101)

Land Sinking In Bikaner of Rajasthan: राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सहग्रासर गावातील रहिवासी जमीन खचण्याच्या (Land Sunk) धक्कादायक घटनेने हादरून गेले आहेत. या गावातील एक शेत अचानक 70 फूट खोल खचले आहे. ही घटना एका रात्रीत घडली आहे. त्यामुळे गावात भीती आणि कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत परिसरातील जवळपासची झाडे आणि रस्त्याच्या एका भागासह अंदाजे 1.5 एकर जमीन व्यापणारी ही धक्कादायक घटना 16 एप्रिल रोजी उघडकीस आली. ही घटना का घडली याबाबत जाणून घेण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India) विभागाचे एक पथक गावात पोहोचले आहे.

गावकऱ्यांची कामधंदा सोडून खचलेल्या शेताकडे धाव

सर्वात प्रथम एका शेतकऱ्याला ही शेतजमीन खचल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने परिसरातील गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेतजमीन खचल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. ज्यामुळे गावकऱ्यांनी कामधंदा सोडून भूस्खलन झालेल्या शेताकडे धाव घेतली. इतकेच नव्हे तर घडलेली घटना पाहून गावकऱ्यांमध्ये भीती आणि कुतुहल अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या. काही अतिउत्साही गावकऱ्यांनी ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यास आणि इंस्टाग्राम रील्सचे चित्रीकरण बनविण्यास सुरुवात केली. तर काहींनी या शेतासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी तर झाली. सोबतच हा परिसर सेल्फी पॉइंटही ठरला.  (हेही वाचा, Afghanistan Landslide: अफगाणिस्तानच्या नूरिस्तान प्रांतात भूस्खलन, 25 ठार, 10 जखमी)

GSI पथक घटनास्थळी दाखल

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची गर्दी आणि संभाव्य धोका विचारात घेऊन कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कलम 144 लागू केले. दरम्यान, जमीन अचानक खचण्याचे नेमके कारण काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी नेमक्याकारणाची उकल करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) चे एक पथक अधिकृत तपासणीसाठी बुधवारी (24 एप्रिल) घटनास्थळी दाखल झाले.(हेही वाचा, युंगांडात मुसळधार पाऊस, भूस्खलनात ४१ लोक ठार)

जीएसआय पथकाकडून प्राथमिक अंदाज व्यक्त

केलेल्या संशोधन आणि सर्व्हेक्षणाचा दाखला देत जीएसआय पथकाने असे मत मांडले आहे की, भूगर्भातील पाण्याचा साठा भूतकाळात कधीतरी जमिनीखाली अस्तित्वात असावा. कालांतराने तो कोरडा पडल्याने माती ओलसर होते आणि ती काली कोसळते.त्यामुळे जमीन खचू शकते. दरम्यान, जीएसआय पथकाने प्राथमिक अंदाज व्यक्तकेला असला तरी जमीन खचण्याचे नेमके कारण काय याबाबत संशोधन सुरु आहे.

व्हिडिओ

दरम्यान, स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ता श्रेयांश यांनी या प्रकरणाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे केल्याचे समजते. भविष्यातील धोके कमी करण्यासाठी तपासाच्या गरजेवर जोर देऊन, श्रेयांश यांनी समाजाचे रक्षण करण्यासाठी अशा नैसर्गिक आपत्तींना समजून घेण्याचे आणि त्यांचे निराकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, परिसरात मात्र घडल्या प्रकारामुळे घबराट पसरली आहे.

0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95+%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0+%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80+%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE+Selfie+Point&via=LatestLYMarathi', 650, 420);">

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel