Mizoram: लहानग्याने वाचवले कोंबडीच्या पिल्लाचे प्राण, पेटा इंडिया तर्फे भारतातील दयाळू बालकाचा मिळाला सन्मान
पेटा तर्फे (Derek C Lalchhanhima)ला भारतातील दयाळू बालक पुरस्कार प्रदान (Photo Credits: Sanga Says Facebook, PETA India)

जगभरात माणुसकी हरवत चाललीय असे विचार रोजच पाहायला मिळत असताना काही दिवस आधी आपल्या सायकलच्या खाली चुकून आलेल्या कोंबडीच्या पिल्लाला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेल्या मिझोरामच्या लहानग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मिझोराम मध्ये राहणाऱ्या ६ वर्षाच्या डेरेक सी लालछनहीमा (Derek C Lalchhanhima) याने प्राण्यांसाठी दाखवलेल्या या काळजीचा नुकताच पेटा या प्राणीप्रेमी संघटनेकडून गौरव करण्यात आला आहे. डेरेकला पेटा (PETA) तर्फे भारतातील दयाळू बालक (PETA India's Compassionate Kid Award) असा किताब दिला गेला.

कोंबडीच्या पिल्लाला हातात घेतलेल्या डेरेकचा व्हायरल फोटो

(PETA) तर्फे डेरेक सी लालछनहीमाला India's Compassionate Kid Award

Derek C Lalchhanhima from Mizoram being awarded PETA India's Compassionate Kid Award (Photo Credits PETA India)

साधारण महिन्याभरापूर्वी सायकल चालवत असताना एक कोंबडीचं पिल्लू नजरचुकीने डेरेकच्या सायकलच्या चाकाखाली आले होते. त्या पिल्लाला दुखापत झालेली बघून डेरेकने त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या इवल्याश्या एका हातात ते पिल्लू आणि एका हातात दहा रुपयांची नोट घेऊन हॉस्पिटल गाठलं त्यावेळी कोणीतरी या चिमुरड्याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला होता आणि अवघ्या काहीच तासात हा सहा वर्षीय डेरेक प्राणी प्रेमाचं उदाहरण म्हणून ओळखला जाऊ लागला. या व्हायरल फोटोच  दाखल घेत पेटा कडून डेरेकचा सन्मान करण्यात आला.

मिझोराम: 'डॉक्टर माझे खाऊचे सगळे पैसे घ्या! पण, कोंबडीच्या या पिल्लाचे प्राण वाचवा', चिमूकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 

ऐझवाल जिल्ह्यातील साइरंग इथल्या छोट्या गावातील सेंट.पीओ या डेरेकच्या शाळेत दयाळू बालकाचं प्रमाणपत्र,फुलं आणि पारंपरिक शाल देऊन हा पुरस्कार करण्यात आला त्याचेही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर होत आहेत.