भारतामध्ये आता 18 वर्षांवरील सार्यांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. त्यामुळे या लसीकरण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांची धावपळ आहे. नागरिकांची व्हॅक्सिनेशन सेंटर निवडीसाठी सुरू असलेली धडपड पाहून त्यांच्या या अधिरवृत्तीचा गैरफायदा घेत काहींनी खोटे मेसेज पसरवायला सुरूवात केली आहे. यात रजिस्ट्रेशन साठी मोबाईल अॅप डाऊन करा आणि झटपट रजिस्ट्रेशन करा अशा मेसेजचा देखील समावेश आहे. सोशल मीडियात वायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये 'VaccinRegis' मोबाईल अॅप वर रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय सुचवला जात आहे. यासोबत एक लिंक देखील दिली जात आहे. मात्र PIB ने हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे.
पीआयबीने खुलासा करताना हा मेसेज खोटा आहे. तुमची फसवणूक करणार्यांपासून दूर रहा. या लिंक वरून व्हॅक्सिन रजिस्ट्रेशनसाठी माहिती भरू नका. भारतात सध्या कोविन अॅप, पोर्टल, आरोग्यसेतू अॅप, उमंग़ अॅप यावरूनच लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. Fact Check: मुंबईतील 'या' लसीकरण केंद्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना दिली जाते लस? मुंबई महानगरपालिकेचा मोठा खुलासा.
पीआयबी पोस्ट
A message claims that people can register for #COVID19Vaccination by downloading a mobile application through the given link.#PIBFactCheck: The link is #Fake. Beware of fraudsters! Do not register for #Covid19 vaccination via this link. pic.twitter.com/DqQ8c9c77u
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 4, 2021
कोरोना संकटकाळामध्ये अनेकदा नागरिकांची खोट्या मेसेज, पोस्ट द्वारा दिशाभूल केली जात असल्याचं, त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता अशा खोट्या बातम्या आणि त्याबाबतची सत्यता पडताळून माहिती देण्यसाठी PIB Fact Check वरून वेळोवेळी नागरिकांना अलर्ट केले जाते.
सध्या देशात 18-44 हा वर्ग लसीकरणासाठी राज्य सरकार कडून तर 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण केंद्र सरकारकडून केले जाते. यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच स्फुटनिक वी देखील उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे.