Fact Check: मुंबईतील 'या' लसीकरण केंद्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना दिली जाते लस? मुंबई महानगरपालिकेचा मोठा खुलासा
Coronavirus (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) कोरोना परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या घटत असून, कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून (BMC) प्रयत्न केले जात आहे. याचपार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजनुसार, मुंबईच्या कोहिनूर चौकातील पार्किंगमधील लसीकरण केंद्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेने या व्हायरल मॅसेजमागचे सत्य शोधून काढले आहे. तसेच ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोहिनूर चौकातील पार्किंगमधील लसीकरण केंद्र हे केवळ 45 व खास नोंदणीकृत मुंबईकरांसाठी आहे. आम्ही कोणत्याही केंद्राकडे जाण्यापूर्वी नागरिकांना वस्तुस्थितीची पडताळणी करण्याची विनंती करतो. यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- गर्लफ्रेंड ची 'ही' इच्छा पूर्ण करण्यासाठी एका माणसाने चक्क आपल्या २ वर्षाच्या मुलाला विकले, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

ट्वीट-

मुंबईत गेल्या 24 तासात 2 हजार 554 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 61 हजार 420 इतकी झाली आहे. मुंबईतील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 5 लाख 94 हजार 859 इतकी आहे. तर, आतापर्यंत एकूण 13 हजार 470 जणांचा मृत्यू झाला आहे.