गर्लफ्रेंड ची 'ही' इच्छा पूर्ण करण्यासाठी एका माणसाने चक्क आपल्या २ वर्षाच्या मुलाला विकले, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का  
Photo Credit: Pixabay representational Image

एखाद्या व्यक्तीला कितीही त्रास सहन करावा लागला तरी तो नेहमीच आपल्या मुलांचे समर्थन करतात आणि त्यांच्याबरोबरच जगणे पसंत करतात, परंतु चीनमध्ये एक भयंकर प्रकरण समोर आले आहे जे ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड ची  इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क आपल्या 2 वर्षाच्या मुलाला विकले आहे.एका बातमीनुसार, आपला मुलीला विकणार्‍या व्यक्तीचे नाव सी. आहे. ज्याचा काही दिवसांपूर्वी पत्नीपासून घटस्फोट झाला होता. सीचा घटस्फोट झाला तेव्हा तो दोन मुलांचा पिता होता. ज्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा होता. घटस्फोटाच्या वेळी मुलीचा ताबा त्याची बायको व मुलाचे संरक्षित त्याला स्वतःला करायचे होते. (धोका पत्करत व्यक्तीने वाचवले बुडणाऱ्या कुत्र्याचे प्राण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

असे सांगितले जात आहे की सी मुलावर खूष नव्हता, तो मुलाबद्दल नेहमीच निराशअसायचा . मिळालेल्या माहितीनुसार सीने याच कारणास्तव आपल्या मुलाला वडील आणि भावासोबत सोडले होते, परंतु एका दिवशी जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने संपूर्ण देशात फिरण्याची इच्छाव्यक्त केली , तेव्हा त्याने आपल्या मुलाला पैशासाठी विकले. सीला आपल्या मुलाला विकून 1.7 दशलक्ष युआन मिळाले होते, ज्याच्या जोरावर सीने तिच्या गर्लफ्रेंडने संपूर्ण चीनमध्ये प्रवास केला. (ATM मधून हँड सॅनिटायझरची चोरी करणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद; Watch Viral Video )

परंतु मुलाच्या अनुपस्थितीबद्दल घरातील सदस्यांना संशय येताच त्यांनी शोध सुरू केला. काहीच न सापडता त्यांनी पोलिसांत या प्रकरणाची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला लवकरच अटक केली. यासह विकलेला मुलगाही ताब्यात घेण्यात आला आहे.