कुत्रा (Dog) हा माणसाचा सर्वात चांगला आणि प्रामाणिक मित्र असतो, असे मानले जाते. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचे अनेक व्हिडिओज समोर आले आहेत. संकटकाळी धावून मदतीला धावून येणारा, दु:खात साथ देणारा अशी कुत्र्यांची उदाहरणे विविध व्हिडिओज किंवा उदाहरणातून समोर आली आहेत. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एक व्यक्ती धोका पत्करत कुत्र्याचे प्राण वाचवताना दिसत आहे. या व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी (Indian Forest Service) सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना आयएफएस सुशांत नंदा यांनी लिहिले, "लोक अनेकदा विसरता की दया नि:शुल्क आहे. हा व्हिडिओ शेअर करताच अल्पावधीतच तो व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडिओला 33.8k व्हुयज मिळाले असून 4 हजार हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ वेगाने पसरत असून लोकांचे मन जिंकत आहे."
पहा व्हिडिओ:
People often forget that kindness is free 💕 pic.twitter.com/Quk5p1YzOd
— Susanta Nanda IFS (@susantananda3) April 30, 2021
कुत्रा पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी एक व्यक्ती धोका पत्करत पाण्यात उतरतो. तो सुरुवातीला आपल्या पायांनी कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपल्या हातींनी पकडून तो कुत्र्याला वर उचलतो. मग तेथे उपस्थित लोक कुत्र्याला बाहेर काढतात. हा संपूर्ण प्रसंग व्हिडिओत पाहता येईल.