ATM मधून हँड सॅनिटायझरची चोरी करणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद; Watch Viral Video
ATM मधून हँड सॅनिटायझरची बॉटल चोरणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस संकटकाळात (Coronavirus Pandemic) लोकांना सातत्याने मास्क (Mask) घालण्याची, सोशल डिस्टसिंग पाळणे (Social Distancing) आणि हँट सॅनिटायझर (Hand Sanitiser) वारण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे अलिकडच्या काळात हँड सॅनिटायझरचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सॅनिटाझरची बॉटल ठेवलेली असते. हात स्वच्छ करण्यासाठी मॉल्स, दुकाने, मेडिकल स्टोअर्स, एटीएममध्ये हँड सॅनिटायझरची बॉटल ठेवलेली पाहायला मिळते. दरम्यान, एटीएममधून सॅनिटायझरची बॉटल चोरणाची एक घटना समोर येत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

आयपीएस दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात एक व्यक्ती एटीएममधून सॅनिटायझर चोरी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना काबरा यांनी लिहिले, "देशात लाखो एटीएम आहेत. अशा मुर्खांनी सॅनिटायझर चोरी नये म्हणून त्याला साखळी लावायचे ठरवले तर प्रत्येक एटीएमसाठी 200-300 रुपये खर्च करावे लागतील आणि यातच शेकडो कोटी रुपये खर्च होतील. मात्र तुमच्या योग्य वर्तनाने हे पैसे वाचतील आणि तुमच्या कल्याणासाठी खर्च केले जातील. असो.. आपण नाही सुधारणार." (पुणे: महिलांचा वेश धारण करुन चोरट्यांनी फोडली ATM मशिन; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

पहा व्हिडिओ:

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल. एक व्यक्ती एटीएम मसीनमधून पैसे काढल्यानंतर आपले कार्ड घेतो आणि बाहेर पडणार तितक्यात त्याची नजर सॅनिटायझरच्या बॉटलवर पडते. तो ती बॉटल उचलतो आणि बॅगमध्ये भरुन तेथून निघून जातो. ही संपूर्ण घटना त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 31.2k व्ह्युज मिळाले असून 590 रीट्वीट्स आणि 290 लाईक्स मिळाले आहेत.