विवाहबाह्य संबंध असलेल्या व्यक्तीसाठी झारखंड पोलिसांची मध्यस्थ म्हणून अजब भूमिका; प्रत्येकी 3 दिवस पत्नी आणि गर्लफ्रेंड सोबत रहा एक दिवस सुट्टी घेण्याचा सल्ला
Extramarital Affair | (Photo Credits: File Photo)

झारखंड पोलिसांनी विवाहबाह्य संबंध (extra-marital affair) असलेल्या एका व्यक्तीला अजब सल्ला दिला असल्याची बाब समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार झारखंड पोलिसांनी (Jharkhand police) एका व्यक्तीला 3 दिवस पत्नीसोबत 3 दिवस गर्लफ्रेंड सोबत तर 1 दिवस सुट्टी घेण्याचा धक्कादायक सल्ला देत मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. राजेश महातो हा रांची चा कोकर तिरली रोड येथील निवासी आहे. विवाह झाला असला तरीही तो एका मुलीसोबत विवाहबाह्य संबंधांमध्ये आहे. अशी माहिती दैनिक जागरणच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

राजेशने लग्नाची पहिली  पत्नी आणि मुलं यांना सोडून तो गर्लफ्रेंड सोबत पळाला. दरम्यान त्याने गर्लफ्रेंडला आपण सिंगल असल्याचं सांगितलं. या प्रकरानंतर राजेश ची पत्नी पोलिस स्टेशन मध्ये पोहचली. यामध्ये गर्लफ्रेंडच्या कुटुंबाकडूनही तक्रार करण्यात आली. तिचं किडनॅपिंग झाल्याचं कुटुंबाने सांगितलं.त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि राजेश त्याच्या गर्लफ्रेंड सोबत आढळला. तोपर्यंत त्याने गर्लफ्रेंड सोबत दुसरा विवाह देखील केला होता. KOOKU Hot Web Series Video: नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधामुळे त्रासलेल्या पत्नीने उगवला सूड; अनोळखी व्यक्तीबरोबर ठेवले शारीरिक संबंध; पहा बोल्ड व्हिडिओ.

दोन महिलांसोबत विवाह केल्यानंतर राजेशच्या दोन्ही पत्नी एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलीच गरमागरमी झाली. त्यावेळेस पोलिसांनी या भांडणामध्ये मध्यस्थी करण्याची भूमीका घेताना सुवर्णमध्य काढत चक्क राजेशला दोघींसोबत प्रत्येकी 3-3 दिवस राहण्याचा अजब सल्ला दिला आहे तर आठवड्यातील एक दिवस सुट्टी घेण्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. आणि त्याहून विशेष बाब म्हणजे दोन्ही पार्टींनी हा करार मान्य केला आहे. त्यावर त्यांनी अधिकृतपणे स्वाक्षरी देखील केली आहे. त्याची कॉपी देखील देण्यात आली आहे. Abu Azami On Live in Relationship: काही महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला - अबू आझमी.

राजेशच्या गर्लफ्रेंडने मात्र त्याच्यावर नंतर काही दिवसांतच लैंगिक अत्याचाराचे आरोप लावत FIR केली आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. स्थानिक न्यायालयाने राजेशच्या नावाने अटक वारंट जारी केले आहे. सध्या राजेश फरार आहे.