Goods Train Derail (Photo Credit - X/@kkjourno)

Goods Train Derailed in West Bengal: पश्चिम बंगाल (West Bengal) मधील मालदा जिल्ह्यातील (Malda District) कुमेदपूर (Kumedpur) येथे मालगाडीचे (Goods Train) पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. बिहार-बंगाल सीमेजवळ झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग सुरळीत चालण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 10:45 च्या सुमारास हा अपघात झाला.

एकूण पाच वॅगन रुळावरून घसरल्या. परंतु, सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही, असं डे यांनी सांगितलं. DN IORG/BTPN/LD 70649 म्हणून ओळखली जाणारी मालगाडी कटिहार विभागातील कुमेदपूर स्टेशनवरून जात होती. यावेळी ही मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली. यामुळे मुख्य मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला. (हेही वाचा -West Bengal Goods Train Derailed: पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात, राणाघाटात मालगाडी रुळावरून घसरली, पाहा व्हिडिओ)

एएनआय ट्विट -

पहा व्हिडिओ -

दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अभियांत्रिकी समस्येमुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं की, घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा -Goods Train Derails in Rajasthan: अलवड यार्डमध्ये मालगाडी रुळावरून घसरली, कोणतीही जीवितहानी नाही)

पेट्रोलने भरलेल्या मालगाडीचे पाच टँकर कुमेदपूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले, ज्यामुळे न्यू जलपाईगुडी आणि कटिहार दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर डाउन लाईन रेल्वे वाहतुकीसाठी मोकळी करण्यात आली आहे. याठिकाणी अप लाईनचे पुनर्संचयित करण्याचे काम सुरू आहे, असंही सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं.