Representational Image | (Photo Credits: File Image)

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojna)  आरोग्य मंत्रालयाकडून निर्माण केलेली सर्वोत्तम आरोग्य संस्था असल्याचा दावा 'स्वास्थ्य एवं जन कल्याण संस्थान'कडून (Swasthya Avm Jan Kalyan Sansthan) करण्यात येत आहे. सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून व्हायरल होणाऱ्या मेसेजेसमध्ये अजून एका मेसेजची भर पडली आहे. दरम्यान, पीआयाबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) या मेसेजमागील तथ्य उलघडले असून ट्विटद्वारे त्याचा खुलासा केला आहे.

पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "स्वास्थ्य सेवा जन कल्याण संस्थान कडून करण्यात आलेला दावा खोटा असून अशा प्रकारची कोणतेही आरोग्य संस्था आरोग्य मंत्रालयाकडून निर्माण करण्यात आलेली नाही." त्यामुळे अर्थातच स्वास्थ्य सेवा जन कल्याण संस्थान हे सर्वोत्तम स्वास्थ्य संस्थान असण्याचा दावा खोटा आहे. (Fact Check: 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार 2 लाख 20 हजार रुपये? PIB ने सांगितले Viral Youtube Video मागील सत्य)

Fact Check By PIB:

देशातील विविध भागातील आरोग्य सुविधा सर्वांना समान प्रमाणात उपलब्ध करुन देणे हे पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेचे उद्दीष्ट आहे. या योजनेअंतर्गत देशातील मागासलेल्या राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण सुधारण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मार्च 2006 मध्ये या योजनेस मंजुरी देण्यात आली. पीएमएसवायच्या पहिल्या टप्प्यात दोन घटक आहेत - पहिला सहा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) पातळीची स्थापना आणि दुसरे म्हणजे विद्यमान तेरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संस्था अपग्रेड करणे.

कोरोना व्हायरस संकटात फेक न्यूजला उधाण आले. सोशल मीडियावर अनेक खोटे दावे मेसेजच्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले. मात्र यांसारख्या दिशाभूल करणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवणे, फॉरवर्ड करणे धोकादायक, त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे सत्य जाणून घेतल्याशिवाय मेसेजवर विश्वास ठेवणे, फॉरवर्ड करणे टाळा.