मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच लॉकडाऊनची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, कोरोना रुग्णवाढीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने पसरु लागला आहे. त्यात सर्व राज्यातील शाळा-कॉलेजेस बंद करण्याचे आणि परीक्षा रद्द करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिल्याचे म्हटले आहे. (PIB Fact Check: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने येत्या 31 मार्च 2020 पर्यंत सर्व गाड्या केल्या रद्द? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा पीबीआयकडून खुलासा)
व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे नागरिकांची दिशाभूल होत असून प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) या मागील सत्याची पडताळणी केली असून हा मेसेज फेक असल्याचे निर्दशनास आले आहे. पीआयबीने सांगितले की, "परीक्षा रद्द करण्याचा कोणताही आदेश केंद्र सरकारने दिलेला नाही. तसंच शाळा-कॉलेजेस बंद किंवा सुरु करण्याचा निर्णय राज्यांद्वारे घेतला जातो."
Fact Check By PIB:
सोशल मीडिया पर स्कूल-कॉलेज बन्द करने और परीक्षा रद्द करने से संबंधित एक तस्वीर शेयर की जा रही है।#PIBFactCheck: केंद्र सरकार द्वारा परीक्षा रद्द करने का आदेश नहीं दिया गया है व स्कूल-कॉलेज खोलने व बंद करने का निर्णय राज्यों द्वारा लिया जाता है। pic.twitter.com/2Y7NdrCQuU
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 17, 2021
कोविड-19 संकट काळात फेक न्यूजंना उधाण आले. सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून खोट्या बातम्या पसरु लागल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येते. दरम्यान, आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र लॉकडाऊन विषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.