Indian Railways (Photo Credit: PIB)

कोरोना काळात सोशल मीडियाच्या (Social Media) वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज काही व्हिडिओ किंवा एखादी माहिती व्हायरल होत असते. ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. यातच भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) संदर्भात अशीच एक माहिती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातमीनुसार, भारतीय रेल्वेने येत्या 31 मार्चपर्यंत सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती वाचल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाची सत्यता शोधण्यासाठी आपल्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना फोन करण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय रेल्वेने येत्या 31 मार्चपर्यंत खरोखरच सर्व गाड्या रद्द केल्या आहेत का? हे जाणून घेण्यासाठी अनेकजण धडपड करत आहे. कोरोना संकटामुळे गेल्या एक वर्षांपासून रेल्वेचा संचालन बंद आहे. सध्या मोजक्याच गाड्या चालवल्या जात आहेत. ज्यामुळे अनेकांना रेल्वेतून प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत. महत्वाचे म्हणजे, रेल्वे सेवा कधीपासून सुरळीत होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. हे देखील वाचा- Fact Check: रेल्वे प्रवासादरम्यान झोप काढत प्रवास करणं अधिक खर्चिक होणार? जाणून घ्या PIB कडून सत्यता

पीआयबीचे ट्वीट-

दरम्यान, फॅक्ट चेकींग वेबसाईट पीआयबीने या बातमी मागची सत्यता शोधून काढली आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीत तथ्थ नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने 31 मार्च 2021 पर्यंत गाड्या रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. ही बातमी जुनी असल्याचे पीआयबीने सांगितले आहे.