Fact Check: रेल्वे प्रवासादरम्यान झोप काढत प्रवास करणं अधिक खर्चिक होणार? जाणून घ्या PIB कडून सत्यता
फेक पोस्ट (Photo Credits: PIB Fact Check)

सोशल मीडीया मध्ये फेक न्यूज या झपाट्याने वायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियामध्ये सध्या रेल्वे प्रवास आणि त्याच्या भाड्याबद्दल एक वृत्त झपाट्याने शेअर केले जात आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की स्लीपर कोच असलेल्या रेल्वे डब्ब्याच्या तिकिटांमध्ये 10% वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या त्याची वृत्त पाहून अनेकांना आता खरंच रेल्वे तिकीटांमध्ये वाढ केली जाणार का हा प्रश्न सतावत आहे. पण पीआयबी फॅक्ट चेक ने दिलेल्या माहितीनुसर या दाव्यामध्ये सत्यता नाही.

PIB फॅक्ट चेक ने या वायरल वृत्ताची सत्यता समोर आणली आहे. फॅक्ट चेक मध्ये पीआयबी ने सांगितल्यानुसार हा खोटा दावा आहे. हा केवळ रेल्वे बोर्ड कडून देण्यात आलेला एक प्रस्तावित विचार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप त्यावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

पीआयबी फॅक्ट चेक

सोशल मीडीयावर लॉकडाऊनच्या काळात अनेक खोट्या बातम्या, अफवा पसरवण्यात आल्या. या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होत असे. त्यामुळे सरकारी योजना, कार्यालयं यांच्याशी निगडीत खोट्या दाव्यांवर पीआयबीकडून स्पष्टता दिली जाते. पीआयबी फॅक्ट चेक द्वारा खोट्या दाव्यांची पोलखोल होते. त्यामुळे कोणत्याही बातमीवर थेट विश्वास ठेवण्याअऊर्वी त्याची सत्यता एकदा नक्की तपासून पहा. सरकारी माहितीवर विश्वास ठेवण्यामध्येच शहाणपण आहे.