Fact Check: फुलांनी सजलेल्या कास पठाराचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या फोटो मागील सत्य
Kaas Pathar Plateau fake photo (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनमुळे (Lockdown) प्रदुषणाच्या प्रमाणात घट झाली. आपल्याला फ्रेश, मोकळे वातावरण अनुभवता आले. याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे कमी झालेल्या प्रदुषणाचा इतका फायदा झाला की सातारा (Satara) येथील कास पठार (Kas Pathar) फुलांनी सजून गेले. लॉकडाऊनमुळे माणसांची निसर्गातील हस्तक्षेप कमी झाला यामुळे हे शक्य झाले. असे सांगणारी पोस्ट सध्या सोशल मीडियाच्या ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook) या माध्यमातून व्हायरल होत आहे. परंतु, हा कास पठारावरील खरा पोटो आहे की फोटोशॉप इमेज हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

कास पठार हे महाराष्ट्रातील आश्चर्यांपैकी एक आहे. त्सास महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लावर असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरावर कास पठार वसलेले आहे. या पठारावर 800 पेक्षा अधिक प्रकारची फुलांची झुडपं आहेत आणि एका काळात ही सर्व झुडपं फुलतात. याच कारणामुळे UNESCO World Natural Heritage साईटमध्ये कास पठाराची नोंद करण्यात आली आहे. या साईटवर अनेकदा कास पठाराचे फोटो शेअर केले जातात. पण सध्या व्हायरल होत असलेले फोटोज कास पठाराचे नाहीत. फेसबुक आणि ट्विटरवर "कास पठार फूलले. माणसांचा वावर नाही. निसर्ग भरभरून प्रतिसाद देतोय." या कॅप्शनसह हे फोटो शेअर केले जात आहेत.

पहा पोस्ट:

हे फोटोज कास पठाराचे नक्कीच नाहीत. कारण simple reverse search वापरल्यानंतर गेल्या आठवड्यात असे अनेक फोटोज इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

Pic claimed as Kaas Pathar (Photo Credits: Google Image)

काही युजर्स हे फोटोज साऊथ आफ्रिकेतील असल्याचेही बोलत आहेत.

हा फोटो अनेकदा ट्विट करण्यात आला आहे. या फोटोचा मूळ स्त्रोत माहित नाही. पण काहीजण हा फोटो अॅनिमेटेड असल्याचे बोलत आहेत. हे फोटोज फेक असण्याचे अजून एक मोठे कारण म्हणेज कास पठारावरील फुले ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यातच फुलतात. त्यामुळे फुले फुलण्याचा हा कालावधी नसल्याने सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटोज फेक असल्याचे स्पष्ट होते.