सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक यांसारख्या माध्यमांवर येणाऱ्या फेक न्यूज, खोटी माहिती नागरिकांची दिशाभूल करते. तर अनेकदा त्याद्वारे लोाकांची फसवणूक केली जाते. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात फेक न्यूजचे प्रस्थ अधिकच वाढले. सोशल मीडियावर फेक न्यूजचे वारे जोरदार वाहू लागले. या सगळ्यामुळे लोकांच्या अस्वस्थतेत भर पडली. दरम्यान अजून एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल होत आहे. महात्मा गांधी बेरोजगार योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi Unemployment Scheme) घरबसल्या काम करुन पैसे कमवाण्याची संधी केंद्र सरकार (Central Government) उपलब्ध करुन देत आहे, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस संकटात बेरोजगार झालेल्या नागरिकांची या मेसेजमुळे नक्कीच दिशाभूल होऊ शकते.
या योजनेअंतर्गत तुम्ही दिवसाला 1000 ते 2000 रुपये घरबसल्या कमवू शकता, असा दावा करण्यात आला आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ स्मार्टफोन असणे आवश्यक आहे, असेही मेसेजमध्ये म्हटले आहे. तसंच ही ऑफर 10 ऑक्टोबर पर्यंत व्हॅलिड असल्याचेही सांगण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आहे.
पीआयबीने या व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजमागील सत्यता तपासली असून या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना राबवली जात नसल्याचे पीआयबीने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. (Fact Check: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेअंतर्गत केंद्र सरकार देणार 2 लाख रुपये? जाणून घ्या पोस्ट मागील तथ्य)
Fact Check By PIB:
दावा : #Whatsapp पर एक मैसेज में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार 'महात्मा गांधी बेरोज़गार योजना' के तहत घर बैठे पैसे कमाने का अवसर दे रही है।#PibFactCheck : यह दावा फ़र्ज़ी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/TfZMrFUjjO
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 3, 2020
त्यामुळे तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका आणि फॉरवर्ड करु नका. अशा प्रकराच्या फेक लिंक्सवर क्लिक करणे टाळा. दरम्यान, सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. त्यामागील सत्यता जाणून घ्या आणि मगच तो मेसेज इतरांसोबत शेअर करा. त्यामुळे तुमचे आणि इतरांचे नुकसान टळेल.