Fact Check: देशातील कोरोनाची परिस्थिती अशातच आता काळी बुरशी (Black Fungus) च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना सध्या दिसून येत आहे. असे मानले जात आहे की, गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने काही प्रकरणांमध्ये कोणत्याही चाचणी शिवाय औषध आणि ऑक्सिनजन दरम्यान निष्काळजीपणा केल्याने ब्लॅक फंगसची प्रकरणे समोर येत आहेत. एका बाजूला ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी रुग्णालयाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियात ब्लॅक फंगस आणि त्यापासून होणाऱ्या कारणांबद्दल विविध दावे केले जात आहेत.
काही दावे असे करण्यात आले आहेत की, त्यामध्ये असे म्हटले आहे घरातील फ्रिज आणि कांद्यामुळे सुद्धा ब्लॅक फंगसचा धोका उद्भवतो. मात्र हे खरं आहे का? याचे उत्तर आहे नाही. आपण सध्या कोरोनाच्या परिस्थितीशी लढा देत आहोत. तर दुसऱ्या बाजूला खोट्या आणि फसव्या गोष्टी, माहिती सोशल मीडियात पसरवल्या जात आहेत. अशातच आपण सावध राहिलेले बरं.(Mucormycosis Myths and Facts: स्वयंपाक घरात कांदे, फ्रीज मधील बुरशी ते कच्ची फळं खाणं यावर खरंच जीवघेण्या Black Fungus आजाराचा धोका अवलंबून आहे का?)
अशातच फेसबुकवर ब्लॅक फंगस संदर्भात एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. त्यात असे म्हटले आहे की, घरगुती ब्लॅक फंगसपासून सावध रहा. जेव्हा तुम्ही कांदे खरेदी करता तेव्हा त्यावर असलेल्या काळ्या डागांकडे लक्ष द्या. खरंतर हे ब्लॅक फंगस आहे. रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये असलेल्या रबरावर येणारा काळ्या रंगाचा स्तर सुद्धा ब्लॅक फंगस आहे. त्यामुळे जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर ही काळी बुरशी फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात जाऊ शकते. मात्र या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा अत्यंत खोटा आहे. कारण रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये तयार कोणारा काळ्या रंगाचा मोल्डमुळे बनणारा फंगस आणि कांद्यावरील काळे डाग हे दोन्ही ब्लॅक बुरशी नसून ते वेगळे आहे.