Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस बाधित चीनमधील हे वृद्ध जोडपे अनेकांना करतंय भावूक; पहा व्हिडिओ व्हायरल
Chinese Elderly Couple in Hospital (Photo Credits: Video Screengrab/ Twitter)

Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीन सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूमुळे 3 डिसेंबरपर्यंत 425 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या चीनमध्ये 14 हजाराहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

भारतात केरळ राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेले 3 रुग्ण आढळले आहेत. सध्या सोशल मीडियावर चीनमधील विविध व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका वृद्ध जोडप्याचा भावून व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे वृद्ध जोडपं एकमेकांचा हात हातात घेऊन बोलताना दिसत आहेत. त्यांच हे प्रेम पाहून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या डोळ्यात नक्की पाणी आल्याशिवाय राहणार नाही. (हेही वाचा - Coronavirus: केरळमध्ये कोरोना व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला)

या व्हिडिओमध्ये हे वृद्ध जोडपं मोठ्या आशेने एकमेकांकडे पाहत आहे. हे वृद्ध जोडपं चीनी भाषेत कुजबुजताना दिसत आहे. चीनी टीक टॉक अॅपमध्ये हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 80 वर्षांच्या या वृद्ध जोडप्याने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतलं आहे. शेवटचा निरोप घेण्यापूर्वी हे जोडपे एकमेकांना निहाळून पाहत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेन्ट्स केल्या आहेत. तसेच या जोडप्याची प्रकृती बरी व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. सध्या चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसची तीव्रता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.