Coronavirus outbreak | photo used for representation Purpose (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात कोरोना व्हायरसने बाधित पहिला रुग्ण केरळमध्ये (Kerala) आढळला. आता केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्णही आढळला आहे. केरळमध्ये मागील आठवड्याभरात 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघडकीस आलं आहे.

सध्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा रुग्ण नुकताच वुहानमधून भारतात परतला होता. सध्या वुहान शहरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या शहरात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. याअगोदर केरळमध्ये कोरोना व्हायरसने बाधित दोन रुग्ण आढळले होते. हे रुग्णदेखील वुहान शहरामधून भारतात परतले होते. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 361 लोकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Coronavirus: वुहान शहरातून एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून 323 भारतीय दिल्लीमध्ये दाखल)

चीनमध्ये 17 हजार नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. भारताने चीनमधील 600 भारतीयांना भारतात परत आणले आहे. या सर्वांची विशेष तपासणी करण्यात आली आहे. सध्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 128 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.