COVID Vaccination (Photo Credits: (BMC/Twitter)

देशभरात कोरोना लसीकरण मोहिम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षांपुढील लोकांनाही लस घेता येणार आहे. या घोषणेनंतर एक भयंकर संदेश सोशल मिडियावर व्हायरल होत होता. तो म्हणजे मासिक पाळी (Periods) दरम्यान मुलींनी अथवा स्त्रियांनी कोविड लस घेऊ नये. मात्र धादांत चुकीची माहिती असून हे सपशेल खोटे असल्याचे मुंबई महानगरपालिकेने (BMC) ट्विट केले आहे. आपल्या ट्विटद्वारे त्यांनी हा संदेश Fake असल्याचे सांगितले आहे.

BMC ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मासिक पाळीच्या लसीच्या कार्यक्षमतेत बदल करण्याचा कोणताही डेटा नाही. हा संदेश प्रचलित आहे खोटे आणि चुकीची माहिती प्रसार करीत आहे." तसेच सर्व पात्र नागरिक शक्य तितक्या लवकर लस घेऊ शकतात आणि घ्यावेत असेही मुंबई मनपाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रशासनाकडून 'ब्रेक द फेक न्यूज सायकल' ही मोहिम सुरु आहे. यात सोशल मिडियावर पसरल्या जाणा-या अफवा आणि चुकीचे संदेश याबाबत माहिती दिली जात आहे.हेदेखील वाचा- मासिक पाळी दरम्यान COVID-19 Vaccine घेणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

काय होती नेमकी पोस्ट?

या पोस्टचे टायटल ‘Reminder For All Women' असं आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरु होणार आहे. लस घेताना आपल्या पीरियड्सच्या तारखेची काळजी मुलींनी घेणे गरजेचे आहे. तुमच्या पीरियड्सच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर मुलींना लस घेऊ नये, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. लस घेतल्यामुळे तुमची इम्युनिटी आधी कमी होते आणि पुन्हा नव्याने तयार होते. त्यामुळे तुम्हाला कोविड-19 ची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून लस घेण्यापूर्वी मुलींना काळजी घ्यावी, असे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट सुरुवातीला व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली. त्यानंतर सोशल मीडियाच्या इतर माध्यमांत ही पोस्ट पसरत गेली.

कोविड-19 लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिलांच्या पाळीच्या तारखांमध्ये बदल दिसून आला आल्याचे काही रिपोर्टमधून समोर आले आहे. परंतु, कोविड-19 लस आणि मासिक पाळीचे चक्र बिघडण्याचा काही संबंध नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.