Snake | Representational image (Photo Credits: pixabay)

बिहारमधील (Bihar) नवादा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने चक्क सापाला चावा (Man Bites Snake to Death) घेतला. ज्यामध्ये सापाचा मृत्यू झाला. राजौली ब्लॉक जंगल परिसरात मंगळवारी ( 2 जून) रात्री उशीरा ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी संतोष लोहार हे रेल्वे लाईन टाकण्याचे काम करणाऱ्या सहकारी मजुरांसह बेस कॅम्पवर झोपले होते. अचानक त्यांच्यावर सापाने हल्ला (Snake Bite) केला. सापाच्या या कृतीचा बदला म्हणून संतोषने सापाला तीन वेळा चावा घेतला आणि शेवटी सापाचा मृत्यू झाला.

अंधश्रध्देतून सापाला चावा

दरम्यान, संतोष लोहार याचा प्रताप सहकारी मजुरांना कळताच त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मात्र, सध्यास्थितीत त्याची प्रकृती चिंताजनक आहे. संतोषणे सांगितले की, त्यांच्या गावात, साप चावला तर त्याचे विष काढून टाकण्यासाठी त्याला तीन वेळा चावावे, अशी त्याच्या गावात मान्यता आहे.  या समजुतीला अनुसरुन त्याने सापाचा चावा घेतला. संतोषणे चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर संतोषला चावलेला साप विषारी होता की, नाही याबाबत जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, संतोषला सर्पदंशाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Cobra in Amazon Package: बंगळुरु येथील जोडप्यास ॲमेझॉन डिलीव्हरी पॅकेजमध्ये आढळला कोब्रा (Watch Video))

डॉक्टरांनी त्यांच्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु केल्यानंतर संतोषची प्रकृती स्थिरावस्थेला आली. दरम्यान, साप आपल्याला चावला म्हणून सापाला चावू नये. त्यातून आरोग्याची वेगळीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे रुग्णांनी त्वरीत वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सुचवतात. सुरक्षेचा उपाय म्हणून डॉक्टर सांगतात की, साप चावल्यानंतर अवयवांनासूज येऊ शकते, तत्पूर्वी बोटातील अंगठ्या आणि घड्याळे काढून ठेवाव्यात. जेणेकरुन रक्तप्रवाह सुरळीत राहील. शक्य असेल तर सपाचा फोटो घेतल्यास उत्तम. जेणेकरुन साप विषारी आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकते. (हेही वाचा, Snake Viral Video: मलेशियाहून चेन्नईला आलेल्या महिलेच्या बॅगेत आढळले 22 जिवंत साप; विमानतळ अधिकारीही थक्क (Watch))

सर्पदंश झाल्यास काय करावे?

जर तुम्हाला साप चावला असेल तर, ताबडतोब सापापासून दूर जावे आणि आपत्कालीन सेवांना कॉल करावे. मदतीची वाट पाहत असताना, तुम्ही पुढील प्राथमिक उपचार पद्धती वापरून पाहू शकता: पीडितेला धीर द्या आणि मदत येईपर्यंत त्यांच्यासोबत राहा. शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून सापाचे छायाचित्र काढा. सूज येण्यापूर्वी कोणतेही घट्ट कपडे किंवा दागिने काढून टाका, जसे की अंगठी, घड्याळे किंवा पायल. चावा साबणाने आणि पाण्याने धुवा आणि स्वच्छ, कोरड्या पट्टीने सैल झाकून टाका.