
पाकिस्तानातून (Pakistan) डॉक्टरांच्या एका टीमने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्ट (Private Part) मधून इलेक्ट्रिक केबल (Electric Cable) काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार त्या व्यक्तीने जाणूनबुजून केला. काही दिवसांपासून लघवी करण्यास त्रास होत असल्याने या व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये 18 सेमी केबल टाकले. त्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचं सांगितलं आहे.
ही घटना पाकिस्तानातील कराची येथील आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. या व्यक्तीला काही काळापासून लघवीची समस्या होती. ही दुरुस्त करण्यासाठी, त्याने आपल्या मूत्रमार्गात 18 सेमी लांबीची वायर घातली. परंतु, ती आत अडकली. या घटनेनंतर त्या व्यक्तीला कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! 44 वर्षीय व्यक्तीने केले बकरीशी लग्न, समोर आले विचित्र कारण (Watch Video))
दरम्यान, जेव्हा या व्यक्तीला वेदना जाणवू लागल्या तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. तेथे त्याची तपासणी करून एक्स-रे करण्यात आले. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी अडकल्याचे डॉक्टरांनी पाहिले. डॉक्टरांनी एक्स-रे पाहिल्यावर त्यांची तारांबळ उडाली. या व्यक्तीवर तातडीने शस्त्रक्रिया करून ती केबल काढण्यात आली. या घटनेमुळे व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता होती, असं डॉक्टरांच्या पथकाने सांगितले.
एखाद्या व्यक्तीने असे कृत्य केल्याची ही काही पहिलीच घटना नाही. काही काळापूर्वी ब्राझीलमधून अशीच एक घटना समोर आली होती. जिथे डॉक्टरांच्या टीमने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून व्यायाम करत असलेला डंबेल काढला होता. त्या व्यक्तीने हे दोन किलोचे डंबेल जाणूनबुजून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवले होते. लैंगिक सुखासाठी त्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.