नुकतेच गुजरातमधील क्षमा बिंदू या मुलीने स्वतःशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या घटनेवरून बराच गदारोळ झाला. हे प्रकरण अजूनही चर्चेत असताना आता आणखी एक विचित्र लग्नाचे प्रकरण समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका इंडोनेशियन व्यक्तीने (Indonesian Man) शेळीशी (Female Goat) लग्न केले आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व विधीही करण्यात आले. यासोबतच या व्यक्तीचे नातेवाईक आणि गावकरीही या लग्नाला उपस्थित होते. लग्नामध्ये वराने पूर्ण लग्नाचा पोशाख परिधान केला होता, तर बकरीलाही खास पोशाख घातला होता.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, या व्यक्तीचे नाव सैफुल आरिफ असून त्याचे वय 44 आहे. तो इंडोनेशियातील बेंझेंग जिल्ह्यातील क्लाम्पोक गावात राहतो. येथे 5 जून रोजी त्याने पारंपरिक पद्धतीने बकरीची विवाह केला. ज्यामध्ये अनेक स्थानिक लोकही सहभागी झाले होते. लग्नात त्याने 22 हजार इंडोनेशियन रुपिया दिले. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर टीकाही करत आहेत. वाढता विरोध पाहून या व्यक्तीनेच लग्नाचे सत्य सांगितले. (हेही वाचा: नवरीचे रुप पाहून नवदेवाला आले मांडवतच रडू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका व्यक्तीने ट्विट करून लिहिले की, सैफुलने मानसिक संतुलन गमावले आहे. त्यावर उपचार करण्याची गरज आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने लग्नात सहभागी असलेल्या लोकांवर आणि तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली. वाद वाढत असल्याचे पाहून या व्यक्तीने आपण हा व्हिडीओ गमतीने बनवला असल्याचे सांगितले. हे लग्न प्रत्यक्षात झाले नाही, असेही तो म्हणाला. व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे तो त्याच्या अभिनयाचा भाग आहे, त्यामुळे लोकांनी ते खरे मानू नये, असेही तो म्हणाला. फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी त्याने हे लग्न केले होते.