अहमदनगर: हॉस्पिटलमध्ये रूग्णाच्या शर्टात विषारी साप; सर्पमित्रांच्या शक्कलीने सापाची सुरक्षित सुटका करून वाचवले प्राण (Watch Video)
Snake Removed From a Sleeping Man’s Shirt (Photo Credits: Video Screengrab/ YouTube)

जे ऐकावं ते नवलंच! सार्वजनिक ठिकाणी वाघ- बिबट्यांपासून ते साप, मगरीपर्यंत अनेक प्राणी उघड वावरताना दिसल्याची उदाहरणे अलीकडे सातत्याने समोर येत असतात. असाच एक प्रकार सध्या अहमदनगर (Ahmednagar)  मध्ये सुद्धा पाहायला मिळाला. आश्चर्य म्हणजे यावेळेस हा प्रकार चक्क एका हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) घडला आहे. आयुसीयु मध्ये झोपलेल्या एका इसमाच्या कपड्यांमध्ये हिरव्या रंगाचा एका साप घुसला होता. ही बाब लक्षात येताच हॉस्पिटलच्या प्रशासनाने तात्काळ काही सर्पमित्रांना (Snake Charmers) बोलावून त्यांच्या मदतीने हा साप व्यक्तीच्या शर्टातुन बाहेर काढला. पण गंमत म्हणजे यावेळी हा माणूस कसलीच जाणीव न होता गाढ झोपलेला होता. सर्पमित्र सापाला शर्टातुन बाहेर काढत असताना एका कर्मचाऱ्याने या घटनेचे रेकॉर्डिंग केले होते आणि आता हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे.

या घटनेतील व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसली तरी हॉस्पिटलच्या माहितीनुसार, या व्यक्तीला उपचारासाठी आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते. या प्रसंगाच्या काही वेळ आधीच तो झोपला होता. त्यावेळी स्वच्छता करण्यासाठी आयसीयू मध्ये आलेल्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यानी एक हिरवट रंगाची सरपटणारी गोष्ट या माणसाच्या शर्टात शिरताना पहिली, हा एक विषारी साप असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सर्पमित्रांना बोलावून घेतले. सर्पमित्र हॉस्पिटल मध्ये येताच या सापाला माणसाच्या शर्टातुन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले, मात्र या दरम्यान जर का रुग्णाला जाग आली असती तर घाबरून त्याने हालचाल केली असती,ज्यामुळे साप डसण्याची भीती होती. म्हणून या व्यक्तीला न जागवता या सर्पमित्राने अलगदपणे सापाला बाहेर काढले. गुजरात: मंदिरात शिरलेल्या मगरीची भाविकांकडून पूजा, वनाधिकाऱ्यांनी केली सुटका

 

पहा या सर्पमित्राच्या कामगिरीची झलक

सर्पमित्र आकाश जाधव याने दिलेल्या माहितीनुसार, हा साप विषारी असल्याने या व्यक्तीच्या जीवाला धोका पोहचण्याची पूर्ण शक्यता होती. त्यामुळे आकाशने चालाखीने सापाला बाहेर काढल्याने या रुग्णाला एक जीवनदानच केले आहे. काही वेळाने या रुग्णाला या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान या घटनेने नेटकरी मात्र हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्न उभारत आहेत.