भारतामध्ये जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. दरम्यान 16 जानेवारीला देशभरात एकाच वेळी लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर सध्या सोशल मीडीयात या लसीकरणाच्या अनुषंगाने काही खोट्या बातम्या, फेक रिपोर्ट्स देखील वायरल होत आहे. अशांपैकीच एक म्हणजे कोविड 19 लसीकरणानंतर 40 विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं वृत्त. पण पीआयबी फॅक्ट चेक कडून हे वृत्त खोटं असल्याचं सांगण्यात आले आहे. एका वृत्तपत्रकामधून जुनं कात्रण वायरल केलं जात आहे. दरम्यान हा प्रकार कानपूर मधील असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
पीआयबी या भारत सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाकडून भारतात कोविड 19 लसीकरणानंतर 40 विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कात्रण देखील जुन्या वृत्ताचं असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नक्की वाचा: Uttar Pradesh: मुरादाबाद येथे कोरोना लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा दुसऱ्याचं दिवशी मृत्यू? नेमक काय आहे प्रकरण वाचा सविस्तर.
PIB Fact Check
A tweet referring to a news article is claiming that 40 students have been hospitalised after being administered with COVID19 vaccine#PIBFactCheck: This claim is #Fake. The news article exhibited is old and has no correlation with the ongoing COVID-19 vaccination drive in India pic.twitter.com/2z3fZprDDs
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 17, 2021
दरम्यान हे वृत्त नोव्हेंबर 2018 मधील आहे. रूबेला च्या लसीकरणानंतर जेव्हा काही विद्यार्थ्यांना रॅश आणि डोकेदुखीचा त्रास जाणवत होता तेव्हा छापण्यात आलेले वृत्त आता वायरल केले जात आहे.
सध्या वायरल होत असलेल्या या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. देशामध्ये सध्या पहिल्या टप्प्यांत कोविड 19 लस ही केवळ डॉक्टर, कोविड योद्धे आणि आरोग्य कर्मचारी यांना दिली जात आहे. त्यामध्ये लहान मुलांचा समावेश नाही. एकूणच जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये 18 वर्षांखालील मुलांना इतक्यात लसीकरण मोहिमेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही.