University of Cambridge मध्ये पीचडी करणार्या एका भारतीय विद्यार्थ्याने सुमारे अडीच हजार वर्ष जुनं कोड सोडवलं आहे. 27 वर्षीय ऋषी अतुल राजपोपट ( Rishi Atul Rajpopat) या विद्यार्थ्याला हे यश गवसलं आहे. दरम्यान BBC च्या रिपोर्ट्सनुसार, ऋषीने संस्कृत भाषेतील विद्वानांपैकी एक पाणिनी यांनी घातलेल्या कोड्याची उकल केली आहे. इसवी सन पूर्व 5 व्या- 6व्या शतकाच्या आसपास विद्वान पाणिनी (Panini) यांनी लिहलेल्या 'अष्टाध्यायी' हा संस्कृत ग्रंथामधील ही उकल आहे. संस्कृत कशी बोलली जाते आणि पवित्र ग्रंथांमध्ये तिचा कसा वापर केला गेला आहे, यांतला शास्त्रीय फरक अष्टाध्यायीमध्ये आहे.
Independent च्या मते, पाणिनीने एक "Metarule" शिकवला ज्याचा पारंपारिकपणे विद्वानांनी केलेला अर्थ "समान शक्तीच्या दोन नियमांमध्ये संघर्ष झाल्यास, व्याकरणाच्या क्रमवारीत नंतर येणारा नियम जिंकतो". पण यामुळे अनेकदा व्याकरणदृष्ट्या चुकीचे निकाल मिळतात.
राजपोपटने हा नियम नाकारत पाणिनी म्हणजे शब्दाच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना लागू होणार्या नियमांमध्ये, पाणिनीला आपण उजव्या बाजूस लागू होणारा नियम निवडावा, असा युक्तिवाद केला. असा निष्कर्ष काढला की पाणिनीच्या "Language Machine" ने जवळजवळ अपवाद वगळता व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द तयार केले. नक्की वाचा: केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल यांचा NASA च्या नावावर अजब दावा; संस्कृत भाषेमुळे भविष्यात येतील बोलणारे संगणक .
संस्कृत ही भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. दरम्यान आज भारतामध्ये केवळ 25 हजार भाषिक संकृत लिहू, वाचू, बोलू शकतात. त्यामुळे अनेक भाषातज्ञ आज राजपोपट यांच्या शोधाला 'क्रांतिकारी' म्हणून संबोधत आहेत.