26/11 Mumbai Attack: मुंबई दहशतवादी हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण! नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शहीदांसह निष्पाप बळींना वाहिली श्रद्धांजली
Mumbai terror attack tributes (Photo Credits: Twitter)

26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (26/11 Mumbai Terror Attack)आज 12 वर्ष पूर्ण झाली. परंतु, त्या रात्रीचा तो थरार आठवताच अद्याप मनात काहुर माजते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी लश्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba)चे 10 दहशतवाद्यांनी (Terrorists) मुंबईवर (Mumbai) बॉम्ब हल्ला आणि बेशूट गोळीबार केला. दहशतावद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, द ताज महल पॅलेस, ओबेरॉय-ट्राइडेंट हॉटेल येथे हल्ला करत निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यात 160 हून अधिक लोक मारले गेले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले.

आज या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या आणि निष्पाप बळींच्या स्मृती अनेकांच्या मनात जागृत आहेत. आज सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शहीदांसह निष्पाप बळींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पाहुया त्यापैकी काही ट्विट्स:

पाकिस्तान मधील कराची येथून 10 दहशतवादी बोटीने मुंबईत दाखल झाले होते. या बोटीमध्ये चार भारतीय होते. बोट किनाऱ्यावर पोहचताच त्यांना ठार मारण्यात आले. 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री आठच्या सुमारास हे दहशतवादी कुलाब्याजवळील कफ परेडच्या मासे बाजारात उतरले. त्यानंतर चार गटात विभागणी करत त्यांनी ठरलेली ठिकाणं गाठली. तीन दिवस दहशतवाद्यांचा थरार सुरुच होता. अखेर 29 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर अजमल कसाब याला जिवंत पकड्यात पोलिसांना यश आले.