Eknath Khadse With NCP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी (Eknath Khadse Quits BJP) देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. आज ना उद्या एकनाथ खडसे भाजप सोडतील अशी चर्चा प्रदीर्घ काळ सुरु होती. परंतू, ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत मात्र उत्सुकता होती. अखेर खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली. परंतू, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का? (Eknath Khadse Quits BJP ) हा प्रश्न अनेकांना पडला. एकनाथ खडसे यांनी स्वत:च मग या प्रश्नाचे उत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म तयार होता

एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना अनेक पक्षांकडून ऑफर होती. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये जेव्हा भाजपने मला तिकीट नाकारले तेव्हा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऑफर होती. स्वत: अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील माझ्या संपर्कात होते. इतकेच नव्हे तर माझ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एबी फॉर्मही तयार ठेवला होता. परंतू, मी भाजप सोडण्याचा विचार केला नाही. पक्षासोबतच राहिला.

शिवसेना, काँग्रेसकडूनही ऑफर

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतो आहे. परंतू, या आधी मला राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षातूनही ऑफर होती. शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी आमच्या पक्षात या असे मला निमंत्रण दिले होते. मात्र, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय स्वीकारला. (हेही वाचा, Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती फायदा होईल? भाजपला हा धक्का आहे का?)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश का?

इतर पक्षांचाही पर्याय उपलब्ध असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पर्याय का निवडला? असे विचारले असता खडसे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. खडसे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि पक्षविस्तारास संधी आहे. शिवाय खानदेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतू, तेथे नेतृत्व नाही. त्यामुळे मला या पक्षात काम करण्यास चांगली संधी आहे, असे खडसे यांनी सांगितले. (हेही वाचा, Cm Uddhav Thackeray On Eknath Khadse: यशाचे डोंगर चढताना पायाचे दगड का निसटत आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा भाजपला चिमटा)

दरम्यान, वस्तुस्थीती अशी की उत्तर महाराष्टातून एकूण 11 आमदार येतात.त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापनेपासून साधारण 2009 पर्यंत 5 खासदार होते. परंतू, 2009 नंतर त्यात कमालीची घट होत गेली. आता उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार आहे. एकनाथ खडसे यांचा विचार करता जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये पर्यायाने खानदेश (उत्तर महाराष्ट्र) विभागात खडसे यांचे वजन चांगले आहे. त्यामुळे या भागात भाजपला धक्का लाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो.