Dahi Handi 2019: नियम मोडणाऱ्या गोविंदा पथकांचे काय होणार? नक्की वाचा
दही हंडी (फोटो सौजन्य-फेसबुक)

गोकूळ अष्टमीच्या (Janmashtami 2019)  निमित्ताने शहरात ठिकठिकाणी दहीहंडीचा सण साजरा केला जातो. तसेच दहीहंडी फोडायला आलेल्या पथकांना दुखापत झालेच्या बातम्या आपल्या कानावर पडत असतात. एवढेच नव्हे तर ,काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षात वरच्या थरावरून पडून होणाऱ्या अपघातचे प्रमाण कमी झाले आहे. या आकडेवारीत अजून चांगली सुधारणा झाली पाहिजे, या उद्दशाने दहीहंडी समन्वय समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहीहंडी फोडायला आलेल्या गोविंदा पथकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. नियमात न बसणाऱ्या गोविंदा पथकाला अपात्र ठरवले जाईल. तसेच या पथकांना दहीहंडी फोडता येणार नाही.

काय आहेत नियम?

सर्व गोविंदा पथाकांनी विमा काढणे गरजेचे आहे. यासोबत पोलिसांच्या परवानगी शिवाय दहिहंडी उत्सवात उतरता येणार नाही. महत्वाचे म्हणजे वरच्या थरावरुन पडून अनेक गोविंदाचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दहीहंडी समितीने १४ वर्षाखालील मुलांना पथकांमध्ये सामील करु नका. तसेच आयोजकांनी वरच्या थरावर चढणाऱ्या गोविंदाचे जन्म दाखला पाहूनच त्यांना संमती द्यावी, असे आदेश दहीहंडी समन्वय समितीने दिले आहेत. जर कोणत्या पथकाने वरील नियमाचे पालन न केल्यास संबधित पथकाला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

(हे देखील वाचा- Janmashtami 2019: राशीनुसार 'या' पद्धतीने करा श्रीकृष्णाचा श्रृंगार आणि नैवेद्याचा बेत, सर्व इच्छा होतील पूर्ण)

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे काही दहीहंडी आयोजकांनी यावर्षी हा सण साजरा न करता पूरग्रस्तांसाठी मदत करायचे ठरवले आहे.