हल्ली कुठल्या गोष्टीतून आर्थिक फसवणूक होईल ह्याचा काही नेमचं उरला नाही. पूर्वी प्रॉपरटी खरेदी (Property Deal), लॉटरी (Lottery) अशा काही बाबीतून फसवणूक व्हायची. पण आता तर तुमच्या हातातला मोबाईल (Mobile) असो, घराबाजूला राहणारा शेजारी (Neighbor) किंवा चौकात बसलेला दुकानदार कुणाकडून आर्थिक फसवणूक होईल ह्याचा काही नेम नाही. पण राज्यातील विविध भागात सध्या लग्नाच्या माध्यमातून गंडा (Wedding Fraud Gang) घालणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. असा प्रकार कुठे एका ठिकाणी नाही तर राज्याच्या वेगवेगळ्या भागात उघकीस आला आहे. तरी फसव्या टोळ्या सामान्यारित्या लग्नाचा प्रस्ताव आणणाऱ्या मध्यस्थाकडून किंवा कुटुंबाकडून गंडा घातला जातो. तसेच लग्नाचे नाते संबंध जोडत असलेल्या कुटुंबाचं खरं नावं पत्ता काही उपलब्ध नसतं. केवळ खोट्या माहितीच्या आधारावर लग्न करुन रक्कम लंपास करण्याचा हेतू आहे. तरी संबंधीत घटनांवर पोलिस सखोल तपास करीत आहेत.
सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव (Khatav) तालुक्यात नुकताचं एक लग्न (Wedding) सोहळा धुमधडाक्यात पार पडल. लग्नानंतर मुलीचे आईवडिल आपल्या घरी गेले आणि नवरी आपल्या सासरी आली. त्या नवरीसह एक करवली ही आली होती. रात्री सगळे झोपी गेले असता ती नवरी करवलीसह अंगावर दागिने (Jewellery) घालून तसेच घरातील काही रोखरक्कम घेवून लंपास झाली. या प्रकरणी नवरदेवाच्या कुटुंबियांनी पोलिसात (Police) तक्रार नोंदवली आहे. (हे ही वाचा:- Mumbai Local Molestation Case: मुंबई लोकल विनयभंग प्रकरणी GRP कडून 43 वर्षीय आरोपीला महालक्ष्मी परिसरातून अटक)
असाच प्रकार माण (Maan) तालुक्यातील मार्डी (Mardi) गावातही घडला आहे. येथे देखील एक लग्न सोहळा अगदी साध्या पध्दतीने पार पडला. नवरी सासरी आली सात दिवस संसार केला आणि काही विधी पुजेसाठी सासरी निघून गेली. पण त्यानंतर ती परतच आली नाही. संपर्क होत नसल्याने नवरदेवाने मुलीच्या माहेरी जावून बघितलं असता. त्या घरात कुणीही राहत नाही किंवा आजूबाजूच्यांना त्यांच्या बाबत जराही माहिती नाही. तरी तुम्ही लग्न करायचा विचार करत असल्यास, सावधान! आवश्यक ती चौकशी करुनचं नाते संबंध जोडणचं शाहण्याचं लक्षणं असेल.