Mumbai Local Molestation Case: मुंबई लोकलमधील विनयभंग प्रकरणी जीआरपीने 43 वर्षीय आरोपी बिहारीलाल यादव याला महालक्ष्मी परिसरातून अटक केली आहे. वकील म्हणून काम करणाऱ्या पीडितेने तिच्या ट्विट पोस्टमध्ये अंधेरी येथील गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) कडे विनयभंगाची तक्रार केली होती. यात तिने पोलिसांच्या उदासीन वृत्तीचाही उल्लेख केला होता. यात पीडिता म्हणाली की, तिला एफआयआर नोंदवण्यासाठी सुमारे तीन तास वाट पहावी लागली तसेच तिला वारंवार घटना सांगावी लागली.
महिलेने सांगितले की, “मी कामासाठी प्रथम श्रेणी महिलांच्या डब्यात जात होते. यावेळी आरोपी लोकलमध्ये चढला. पुढचे स्टेशन जवळ येत असताना आरोपीने माझा विनयभंग केला आणि तो लगेच ट्रेनमधून उतरलो. या घटनेचा मला मोठा धक्का बसला." (हेही वाचा - State Board for Wildlife: शिंदे सरकारचा उद्धव ठाकरे गटाला झटका! राज्य वन्यजीव मंडळातील आदित्य ठाकरेसह 12 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द)
यासंदर्भात तक्रार देण्यासाठी जेव्हा ती अंधेरी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा तिला पोलिसांनी 'विनयभंग म्हणजे काय' असा गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. याशिवाय पीडितेला स्टेशनवर उपस्थित असलेल्या महिला पोलिसांकडूनही असाच उदासीन प्रतिसाद मिळाला.
या सर्व प्रकारानंतर पीडितेला अंधेरी पोलिसांनी सांगितले की, केस त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही आणि ते सर्व तपशील हस्तांतरित करतील. त्यानंतर या महिलेचे ट्विट व्हायरल झाले आणि अनेकांनी पोलिसांच्या उदासीन वृत्तीवर प्रतिक्रिया नोंदवली.