Weather in Maharashtra: महाराष्ट्रात तापमान वाढले, विदर्भात काही भागात उष्णतेची लाट
Temperature| Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात हळुहळू उन्हाचा कडाका वाढत असून तपामनाचा (Weather in Maharashtra) पारा वाढत आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात (Marathwada) दिवसाचे कमाल तापमान 40 अंश सेल्सीअस इतक्या पातळीवर पोहोचले आहे. तर विदर्भासह (Vidarbha) काही भागात उष्णतेची लाट (Heatwave) पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबई आणि कोकणात मात्र गेल्या काही दिवसांमध्ये 40 अंश सेल्सीअसवर गेलेला पारा खाली उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, रत्नगिरीमध्ये अनुक्रमे 34.36 आणि 33.3 अंश लेल्सिअस इतक्या कमाल तपामनाची नोंद सोमवारी झाली. दरम्यान, पुढी पाच दिवस तापमानवाढ मुंबई, कोकण हे विभाग वळता कायम राहणार असा अंदाच वर्तविण्यत आला आहे.

सध्या विदर्भात उष्णतेची लाट जाणवत आहे. तर गेल्याच आठवड्यात मुंबई आणि कोकणातील काही विभागांमध्ये अशाच प्रकारची उष्णतेची लाट पाहायला मिळाली. मंबई आणि रत्नागिरीत पारा 40 अंश सेल्सीअसच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. यासोबत उर्वरीत महाराष्ट्रही तापताना दिसला. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, महाराष्ट्र आणि मध्य भारतात या वेळी तापमान 2 ते 4 अंश सेल्सीअस इतक्या प्राणात वाढू शकते.

देशातील तापमानाकडे नजर टाकता राजस्थान आणि मध्य प्रदेश, गुजरात या काही राज्यामध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. आज (30 मार्च) विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात सध्या सरासरीच्या तुलनेत पारा 3 ते 4.5 अंशांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आज विदर्भातील तापमान सर्वच ठिकाणी सरासरी 40 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

एका बाजूला कोरोना व्हायरस प्रादूर्भाव तर दुसऱ्या बाजूला वाढते तापमान अशा दुहेरी परिणामांना नागरिकांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वातावरण बदलाकडे गांभीर्याने पाहात नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आरोग्याच्या तक्रारी टाळण्यासाठी कडक उन्हात अधिक वेळ काम न करणे. उन्हात जाताना डोक्याला टोपी, डोळ्यांना गॉगल लावणे. दिवसभरात पाणी पिण्याचे प्रमाण अधिक ठेवणे. यासोबतच थंड पदार्थ आहारात ठेवणे. कोणत्याही प्रकारे शितपेये टाळणे, अशी काळजी घेण्याचे अवाहन केले जात आहे.