आरेमध्ये (Aarey) 2,700 पेक्षा जास्त झाडे तोडण्यास मान्यता दिल्यानंतर निषेध अधिकच वाढत जात आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. महानगरपालिकेच्या हिरव्या फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगाव येथील आरे कॉलनीतील मेट्रो कार शेडसाठी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वृक्ष प्राधिकरणाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. जेव्हा हा प्रस्ताव पास झाल्यापासून त्याचा कडाडून विरोध केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतासाठी 31 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळणार्या जाफर यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली.
"जेव्हा काही चूक झाली तेव्हा मुंबईकर अरेरे यार म्हणतात. आरे जंगलाबद्दल आता 'आरे' यार म्हणायची वेळ आली आहे. #आरेजंगल #आरेफॉरेस्टवाचवा #आरेवाचवामुंबईवाचवा, जाफर यांनी ट्विटरवर लिहिले. जाफरने '' इज़ आरे नॉट अ फॉरेस्ट'' या फोटोसह पोस्ट शेअर केली.
When something goes wrong, Mumbaikars say Arey Yaar. Its time to say Aarey Yaar about Aarey forest. #AareyForest #SaveAareyForest #SaveAareySaveMumbai @mybmc pic.twitter.com/2cPrRcRBqA
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) September 3, 2019
रविवारी बॉलिवूड अभिनेता श्रद्धा कपूर नागरी संस्थेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाला हास्यास्पद असल्याचे सांगत या निषेधात सहभागी झाली. श्रद्धा या मोहिमेद्वारे अभिनेत्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रचारादरम्यान एक फोटो शेअर करताना श्रद्धाने लिहिले की "मी माझ्या बाजूने थोडे योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे."