वर्धा शहर हे वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्याचे सर्व महत्त्वाचे मुख्य शासकीय कार्यालये वर्धा शहरात आहेत. वर्धा नदीच्या नावावरुन वर्धा हे नाव शहराला पडले. २०११ च्या जनगननेनुसार वर्धा शहराची ३ लाख ५७ बजार ४७६ इतकी लोकसंख्या आहे. ‘वर्धा शहर’ (Wardha City) हा विधानसभा मतदारसंघ ‘वर्धा लोकसभा मतदारसंघा’चा एक भाग आहे. या मतदारसंघात सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. मात्र 2014 साली विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. पंकज राजेश भोयर (Dr. Pankaj Bhoir) यांनी प्रमोद शेंडे यांचे चिरंजीव शेखर शेंडे यांचा पराभव केला आणि वर्धा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळवता आली.
वर्ध्यामध्ये असलेली काँग्रेसची सत्ता मोडीत काढीत भाजपने 2014 साली वर्ध्यात विजय मिळविला. या विजयाचे भाजपचे उमेदवीर डॉ.पंकज भोयर यंदा पुन्हा विधानसभा निवडणूकीसाठी उभे राहिले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे (Raju Timande) ही निवडणूक लढविणार आहे. वर्ध्याच्या मतदारांनी डॉ. पंकज भोयर यांच्यावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी निवडू दिले. या मतदारसंघात भाजपचा हा ऐतिहासिक विजय होता. कारण आतापर्यंत एकदाही भाजपला या मतदारसंघातून विजय मिळवता आला नव्हता.
याच वर्ध्यात हिंगणघाट (Hinganghat) हा देखील मतदारसंघ आहे. या मतदारसंघातही 1972 ते 1985 पर्यंत काँग्रेसची सत्ता राहिली. त्यानंतर 1985 साली काँग्रेस सोशलिस्टचे वसंत बोंडे जिंकून आले. बोंडे 1990 साली जनता दलात सामील झाले आणि पुन्हा एकदा 1990 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आले. 1995 ते 2004 या मतदारसंघात शिवसेनेची सत्ता राहिली. 2004 साली पहिल्यांदा राष्ट्रवादीला या मतदारसंघात जिंकता आले. मात्र, 2009 साली शिवसेनेची पुन्हा सत्ता आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघात भाजपचा पहिला उमेदवार निवडून आला. समीर कुणावार (Sameer Kunavar) हे या पक्षाचे विजयी उमेदवार होते. यंदाही समीर कुणावार या मतदारसंघातून पुन्हा एकदा आपले नशीब आजमावणार आहेत. अपक्षचे उमेदवार अतुल कंदिल (Atul Kandil) हे त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार आहे.
त्याचप्रमाणे देवळी (Deoli) विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात 1999 पासून काँग्रेसची सत्ता आहे. या मतदारसंघातून सलग चार वेळा काँग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे (Ranjeet Kamble) विजयी झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख (Sameer Deshmukh) यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. असे झाल्यास हा भाजपचा ऐतिहासिक विजय तर काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. हेदेखील वाचा- नागपूर: मतदानाचा हक्क बजवा आणि पेंच मध्ये MTDC रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये 25 टक्के सूट मिळवा!
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहर (Aarvi) हे देखील विधानसभा निवडणूकीसाठी महत्त्वाचा मतदारसंघ आहे. . या मतदारसंघात 1990 पासून 2009 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दादाराव केचे यांनी काँग्रेसचे अमर काळे यांचा पराभव केला होता. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अमर काळे यांनी दादाराव यांचा पराभव केला. आर्वी मतदारसंघात काळे कुटुंबियांचे चांगेल वर्चस्व आहे. 2014 साली देशभरात मोदी लाट होती. मात्र, तरीही भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार दादाराव केचे (Dadarao Keche) यांचा पराभव होऊन अमर काळे (Amar Kale) यांचा विजय झाला. त्यामुळे यंदाही हे चित्र तसेच कायम राहते की बदलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
एकूणच वर्ध्यातील विधानसभा निवडणूक ही अटीतटीची आणि चुरशीची असणार आहे. वर्ध्यातील आर्वी, देवळी या मतदारसंघातील चित्र बदलणार की काँग्रेसचे वर्चस्व कायम राहणार औत्सुक्याचे ठरेल.