नागपूर: मतदानाचा हक्क बजवा आणि पेंच मध्ये MTDC रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये 25 टक्के सूट मिळवा!
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

समाजामध्ये निवडणूकीदरम्यान मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांनी मतदान करण्यासाठी सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे. यामध्ये आता रामटेक मध्ये मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदानासाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रात असलेल्या MTDC रिसॉर्ट व हॉटेलमध्ये वास्तव्य आणि जेवणाच्या दरात 10 ते 25 टक्के सवलत देण्याची ऑफर जाहीर केली आहे. ही माहिती रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: PwD App च्या मदतीने दिव्यांग मतदार घरबसल्या करू शकतील मतदार नोंदणी ते व्हिलचेअरसाठी विनंती

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूक 2019 पार पडणार आहे. त्यामुळे 21 ऑक्टोबरनंतर पुढील 15 दिवस या सवलतीचा फायदा घेता येणार आहे. यासाठी मतदारांना आपला मतदानाचा पुरावा म्हणून आपले शाई लावलेले बोट दाखवणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ मतदान केलेल्याच मतदारांसाठी असेल. Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स

पेंच परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) किल्लारी येथील रिसॉर्ट, सिल्लारी येथील अमलतास, पिपरिया येथील गो फ्लेमिंगो रिसॉर्ट, श्रृष्टी जंगल होम सिल्लारी, तुली, वीरबाग, (बांद्रा) टायगर कॅरॉडॉर (पेंच), खुर्सापार, ऑलिव्ह व्हिला, पेंच,ऑलिव्ह रिसॉर्ट, खिंडशी व राजकमल बोटींग सेंटर, खिंडशी, रामधाम, मनसर तसेच कर्माझरी येथील ऑलिव्ह व्हिला उपलब्ध आहे. या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये 21 ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पुढील 15 दिवस पर्यटकांना जेवणावर 10 ते 20 टक्के तसेच राहण्यावर 10 ते 25 टक्केपर्यंत सवलत मिळणार आहे.