Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स
File Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Aseembly Elections) आता महिन्यभारहून कमी अवधी शिल्लक आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे तर त्यानंतर लगेचच 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येतील. असं म्हणतात, एका मतदात्याशिवाय नेता घडत नाही, आणि नेत्याशिवाय लोकशाही चालत नाही, त्यामुळे या संपूर्ण निवडणूक सत्रात एका जबाबदार मतदार म्हणून तुम्हालाही महत्वपूर्ण कामगिरी पार पाडायची आहे. याआधी तुमचे नाव मतदार यादीत आहे का हे पाहणे आवश्यक आहे. लक्षात घ्या यापूर्वी जरी तुम्ही निवडणुकांमध्ये मतदार म्हणून सहभाग घेतला असेल तरी निवडणूक आयोग वारंवार आपल्याकडील माहिती अपडेट करत असते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनंद्धी ही मतदार यादी नक्की तपासून पहा.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत तब्बल 10 कोटी मतदार सहभागी होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोग व त्यानंतर राज्य आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्रातील रहिवाशी मतदार यादी तपासून पाहू शकता. हे काम जरी किचकट वाटत असले तरी या काही सोप्पय सेटप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाईन सुद्धा मतदार यादी बघू शकता..

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कसे तपासाल आपले नाव

-निवडणूक आयोगाची eci.gov.in वेबसाईट उघडा

- मतदार यादीत नाव शोधा या पर्यायावर क्लिक करा.

-इथून तुम्हाला आयोगाच्या या पोर्टलवर नेण्यात येईल

- इथे आपला मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा विचरण्यात येणारी वैयक्तिक माहिती भरा

राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नाव तपासण्यासाठी

-ceo.maharashtra.gov.in ही वेबसाईट सुरु करा

-2nd Summary Revision 2019 - Search your Name in Final Electoral Roll 2019 या पर्यायावर क्लिक करा

- यानंतर एक पीडीएफ सुरु होईल, यामध्ये तुम्ही आपले नाव तपासून पाहू शकता

-या यादीची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवा, ही प्रिंट दाखवून तुम्ही मतदान केंदारवर मतदान करू शकता

दरम्यान,2014 च्या निवडणुकांचे वेळापत्रक पाहता महाराष्ट्रात साधारण 20 सप्टेंबरच्या सुमारास निवडणुकांची घोषणा झाली होती, तसेच 15 ऑक्टोबर रोजी मतदान घेऊन 19 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आले होते. यंदा मात्र दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकांचे काम आटोपण्याचे निवडणूक आयोगाचे नियोजन आहे.