Nashik Crime: मित्रांच्या भांडणात एका अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी अंत, गुन्हा दाखल, नाशिक येथील खळबळजनक घटना
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Nashik Crime:  नाशिक मध्ये अतंत्य धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या क्षुल्लक कारणांनी मित्रांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. हाणामारीत मुलाला गुप्त भागात मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दवाखानात दाखल करताच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मुलाच्या कुटुंबियांनी दिली. (हेही वाचा- परप्रांतीय महिलेचा नाशिकमध्ये खून, एक जण गंभीर जखमी,गुन्हा दाखल)

प्राप्त माहितीनुसार, मुले घराबाहेर मोबाईल खेळत होते. आपल्या मित्राच्या चेष्टा मस्करीत गुप्त भागात एकाने मारलं. ही घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली आहे.या घटनेनंतर कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील स्टेशनवाडी परिसरात मित्रांच्या आपापसात वादा झाला होता. वादानंतर एकमेकांना मारहाण देखील केली. मारहाणीत एकाने १५ वर्षाच्या मुलाच्या गुप्त भागात लाथ मारली. यात त्याचा मृत्यू झाला. लवनीत किरणकुमार भगवाणे असं मृत मुलाचे नाव आहे. तो १५ वर्षाचा होता.

या प्रकरणी मुलाच्या आई वडिलांनी पोलिस ठाण्यात इतर मुलांविरुध्दात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केले आहे. तक्रारदाराने पोलिसांत सांगितले की, सुमित नावाचा एक मुलगा आणि लवनीत दोघे जण मज्जा मस्ती करत होते. त्यांच्या काही भांडण झाले. त्याने लवनीच्या डोक्याला आणि पोटाला मारलं. पोटात तीन ते चार बुक्के मारले आणि तो खाली पडला. नंतर त्यांच्या गुप्त भागात कोपरा मारला. मारहाणीची माहिती मिळताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.