
Nashik Crime: नाशिक जिल्ह्यात एक भयावह कृत्य घडल्याचे समोर आले आहे. एका परप्रांतिय विवाहीत महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि महिलेला आणि तिच्या भाच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेने प्राण गमावले तर भाचा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरु केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा-माटुंगा पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीमध्ये सापडला चालकाचा मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सामनगाव येथे एकलहरा गेटजवळील अज्ञाताने पीडित महिलेच्या गळ्यावर धारधार हत्याराने वार केला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृच महिलेच्या भाच्यावर देखील जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला आणि तिचं कुटुंब हे उत्तर प्रदेशातील आहे. महिला आपल्या कुटुंबासोबत सामनगाव येथील तांबोळी हॉस्पिटलच्या शेजारी भाड्याच्या खोलीत राहत होती. क्रांती असं मृत महिलेचे नाव आहे. क्रांती पती आणि दोन मुलांसोबत आणि भाच्यासोबत राहत होती.
बुधवारच्या रात्री जेवण झाल्यानंतर क्रांती आणि तीचा भाचा अभिषेक सिंग जेव्हा घरात एकटे होते त्यावेळी ही घटना घडली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. जखमी अभिषेक वर जिल्ह्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.