मुंबई मध्ये कोरोना संकटाचं सावट दूर सारून काल (15 जानेवारी) टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) पार पडली आहे. या मॅरेथॉन मध्ये यंदा स्पर्धकांच्या जागृकतेमुळे अपघातांच्या, स्पर्धकांच्या जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या तसेच वैद्यकीय मदत घ्यावी लागण्याच्या प्रकरणांमध्येही घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एकाला हार्ट अटॅक (Heart Attack) आणि अन्य 13 जणांना किरकोळ दुखापत, डिहायड्रेशन (dehydration) यांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. पण उपचारांनंतर कालच त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देखील देण्यात आली आहे.
55 हजार स्पर्धकांमधून यंदा 1983 जणांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली. यामध्ये 40% पेक्षा जास्त जण हे डीहायड्रेशनचे शिकार ठरले. 8 जणांना गंभीर स्वरूपाचा डीहायड्रेशनचा त्रास झाला तर 3 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. 40 जणांना ऑन द स्पॉट अॅम्ब्युलंस मध्येच उपचार देण्यात आले. नक्की वाचा: Mumbai Marathon 2023: मुंबई मॅरेथॉन, तब्बल 55 हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्यासह, देवेंद्र फडणवीस, किरण रिजजू यांचीही उपस्थिती.
Akbar Ali Pathan या स्पर्धकाला हार्ट अटॅक आला होता. या स्पर्धेचे मेडिकल पार्टनर Asian Heart Institute कडून त्याला तातडीचे उपचार देण्यात आले. त्यानंतर अकबरला लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. लीलावती मध्ये डॉ. जलील पारकर यांनी ही व्यक्ती आयसीयू मध्ये असून आज अॅन्जिओग्राफी होणार असल्याचं सांगितलं आहे.
मॅरेथॉन मध्ये वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या इतर सहभागींना येणाऱ्या समस्यांबद्दल माहिती देताना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे क्रिटिकल केअर आणि मेडिकल अफेअर्सचे संचालक आणि मॅरेथॉनचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय डिसिल्वा यांच्या माहितीनुसार, 55% स्पर्धकांना मसल्स क्रॅम्प्सचा त्रास, स्नायू दुखणे, आणि किरकोळ जखम अशा समस्या उद्भवल्या होत्या. 5% पेक्षा कमी स्पर्धकांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावं लागलं.
Dr D’Silva यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 हॉस्पिटलमध्ये दाखल स्पर्धकांमध्ये 5 जण सैफी रूग्णालयात, 4 जण बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, 3 जण जसलोक मध्ये तर दोन जण लीलावती मध्ये दाखल आहेत. 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाला पायाला फ्रॅक्चर. एकाचा शोल्डर डिस्लोकेशन, एकाला पडल्यामुळे चेहर्याला दुखापत झाली आहे. अन्य दुखापतींमध्ये बोटांना दुखापत, हात दुखावल्याची तर फूट ब्लिस्टर, चेस्ट पेन, पायात गोळा येणं आणि hypothermia सारख्या समस्या होत्या.
अनेक वर्षांपासून या मॅरेथॉनशी जोडले गेलेले पल्मोनोलॉजिस्ट डॉ कुमार दोशी यांनी सांगितले की, इव्हेंटपूर्वी बरेच स्पर्धक आता पुरेसे आणि योग्य प्रशिक्षण घेऊन योग्यरित्या तयारी करून येत असल्याने मागील काही वर्षांत दुखापतींची संख्या कमी झाली आहे. या स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर स्वतःला क्षमतेबाहेर जाऊन त्रास देणं, थकवणं योग्य नाही हा थम्ब रूल आहे. आधीच आजूबाजूचं वाढतं प्रदुषण हृद्य आणि फुफ्फुसांवर परिणाम करत आहे.