Mumbai Marathon 2023 | (PC:TataMumMarathon)

दोन वर्ष्यांच्या प्रदीर्घ थांब्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई धावली. होय, कोरोना काळातील आठवणींना पाठिमागे सोडत आज 18 व्या मॅरेथॉन स्पर्धेला (Mumbai Marathon News) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेत 55 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. एकूण 7 गटांमध्ये आयोजित करण्यात आलेली स्पर्धा वांद्रे-वरळी सीलिंक, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली, पेडर रोड, बाबुलनाथ मंदिर, चौपाटी आणि आझाद मैदानच्या शेजारी असणार आहे. . फुल आणि हाफ अशा दोन्ही मॅरेथॉन याच मार्गावरुन धावल्या. मॅरेथॉन स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

मॅरेथॉनमध्ये विजेत्या प्रत्येक महिला आणि पुरुषास प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. मॅरेथॉनसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण 540 अधिकारी, 3145 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलिसांच्या 18 तुकड्या, चार दंगल पथके, 18 जलद गती दलाची पथके, वाहतूक पोलिस, वॉर्डन तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथके यांच्यासह स्थानिक पोलिसही मोठ्या प्रमाणावर तैनात केले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही स्पर्धेवर नजर ठेवली जाणार आहे.

ट्विट

मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जाते. यात अनेक मुंबईकर सहभागी होतात. मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. मुंबईकरांनीही जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे ते म्हणाले.