बदलत्या हवामानामुळे ताप, व्हायरल फ्लू ही लक्षणं दिसतात. मात्र स्वाईन फ्लू, डेंगी यासारख्या आजारामध्ये ही लक्षण प्रामुख्याने आढळतात. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यावरच ही लक्षण तुम्हांलाअ जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आणि तपासणी करून योग्य निदान करा अशा सूचना डॉक्टरांनी महाराष्ट्रात केल्या आहेत. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रभरात 302 रूग्णांनी स्वाईन फ्लूमुळे जीव गमावला आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आकडेवारीनुसार, स्वाईन फ्लूमुळे 302 बळी गेले आहेत. तर सुमारे 325 रूग्ण सध्या विविध हॉस्पिटल्समध्ये स्वाईन फ्लूवर उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्यांपैकी 22-23 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. महराष्ट्रात स्वाईन फ्लू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. देशभरात 542 रूग्ण स्वाईन फ्लूमुळे दगावले. त्यापैकी निम्मे रूग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.
स्वाईन फ्लूची नेमकी लक्षण कोणती ?
स्वाईन फ्लू हा H1N1 टाइप-ए- इन्फ्ल्यूएंझा या नावाने ओळखला जातो. त्यामूळे विषाणूची बाधा झाल्यानंतर सुमारे 7-10 दिवसांमध्ये झपाट्याने त्याची वाढ होते. त्यामुळे खालील लक्षण 3-4 दिवसात आटोक्यात न आल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.
ताप - ताप हे स्वाईन फ्लूचं प्रमुख लक्षण आहे. सतत्याने ताप १०० फॅरनाइट हून अधिक असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
डोकेदुखी - ताप,थकव्यासोबत डोकेदुखी जाणवत असेल तर काळजी घ्या.सामान्य डोकेदुखी आणि आजारात दुखणारं डोकं यामधील शरीराकडून मिळणारे संकेत वेळीच ओळखा
थंडी - वातावरणात पुरेशी उष्णता असूनही तुम्हांला थंड वाटत असेल तर काळजी घेणं आवश्यक आहे.
डायरिया - तापामध्ये डायरिया, उलट्यांचा त्रास होत असेल तर हे स्वाईन फ्लूचे संकेत आहेत.
घसा दुखणं, खोकला - तापासोबतच घसा खवखवणं, खोकला, शिंका,नाक चोंदणं ही लक्षण दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
स्वाईल फ्लूची लक्षण ही अगदीच सामान्य आणि इतरही काही आजारांमध्ये प्रामुख्याने आढळतात. त्यामुळे केवळ लक्षणांवरून स्वतःच्या मनाने आजाराचे निदान करू नका. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य चाचण्यांद्वारा स्वाईन फ्लूचं निदान करा.